कार्यक्रमात खुर्चीवर बसताच सैफला काहीतरी टोचलं…अन् तो सगळ्यांसमोर जोरात ओरडला

कार्यक्रमात खुर्चीवर बसताच सैफला काहीतरी टोचलं…अन् तो सगळ्यांसमोर जोरात ओरडला

अभिनेता सैफ अली खान चर्चेत आला तो त्याच्यावरील चाकू हल्ल्यामुळे. त्याच्यावरील उपचारानंतर काही दिवस आराम केल्यावर तो पुन्हा एकदा जोरदार तयारीला लागला आहे. ‘पाताल लोक’ फेम अभिनेता जयदीप अहलावतने यापूर्वी करीना कपूरसोबत काम केले होतं. आता तो सैफ अली खानसोबत काम करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘ज्वेल थीफ’ आहे. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलर लाँचच्यावेळीचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये सैफसोबत एक मजेदार किस्सा घडला. या घटनेनंतर तो एवढ्या जोरात ओरडला की सर्वांना दोन मिनीटे चिंता वाटली. पण नंतर सर्वांना हसू आवरता आलं नाही.

ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सैफसोबत विचित्र क्षण

‘ज्वेल थीफ’च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सैफसोबत विचित्र क्षण त्याच्यासोबत घडला. स्टेजवरील खुर्चीवर बसताना त्याला काहीतरी टोचले. आणि तो जोरात ओरडला. या क्षणानंतर तो स्वतः मोठ्याने हसायला लागतो. ‘ज्वेल थीफ’ या व्हिडिओच्या प्रमोशन दरम्यान, स्टार कास्टच्या हातात एक लाल हिरा दिसला. सुरुवातीला, प्रमोशनदरम्यान सैफनेही तो हिरा सर्वांना दाखवला. आणि त्याच्यासोबत फोटो काढताना भरपूर पोझही दिला. पोझ दिल्यानंतर, त्याने तो हिरा त्याच्या जीन्सच्या मागच्या खिशात ठेवला.

अन् सैफ जोरात ओरडला

त्यानंतर तो स्टेजवर गेला आणि तिथे खुर्चीवर बसताना तो खिशातून हिरा काढायला विसरला. त्यामुळे बसताना त्याला तो हिरा टोचला तेव्हा तो जोरात ओरडला. नंतर जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा तो मोठ्याने हसायला लागला. हे पाहून कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व लोकही हसायला लागतात. हा घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


‘ज्वेल थीफ’ हा नेटफ्लिक्सवरील एक उच्च दर्जाचा चित्रपट आहे. ज्यामध्ये सैफ अली खान एका चोराची भूमिका करतो. तो चित्रपटात आफ्रिकन रेड सन हिरा चोरतो. या चित्रपटात निकिता दत्ता आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत. आता त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे जिथे पुन्हा एकदा चोरीचा भयंकर खेळ पाहायला मिळतो.

सैफ आणि करीना दोघेही आपल्या कामात बिझी झाले आहेत 

दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यानंतर तो सातत्यानं चर्चेत आहे. त्याच्यावर हल्ल्या करण्याच्या आरोपीची अजूनही चौकशी सुरू आहे. चाकूहल्ल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सर्जरी झाली आणि त्यातून तो सुखरूप बाहेर पडला आहे. जे घडलं ते सर्व विसरून सैफ आणि करीना दोघेही आपल्या कामात बिझी झाले आहेत. सैफ अली खानचा ‘ज्वेल थीफ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सैफ अली खान बिझी आहे.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला खूप घाम येत असतो. त्यात घामामुळे डोक्यातील स्कॅल्पला खाज येण्याची समस्या अनेकदा उद्भवते. कधीकधी ही खाज...
benefits green chillies: हिरवी मिरची नाही, गुणांचा खजिना म्हणा साहेब..! फायदे जाणून अश्चर्यचकित व्हाल
शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन, थेट आत्मदहनाचा इशारा; प्रमुख मागण्या काय?
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांची नियुक्ती, 14 मे रोजी घेणार शपथ
IPL 2025 – फाफ डू प्लेसिस एकटाच भिडला; फिरकीपटूंनी दिल्लीचे मनसुबे उधळले, कोलकाताचा 14 धावांनी विजय
बोगस कर्जमाफी प्रकरण : मंत्री राधाकृष्ण विखेंसह 54 जणांवर गुन्हा दाखल
नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ