माळशेजच्या पर्यटकांना घेता येणार स्कायवॉकचा आनंद; प्रस्ताव तयार करण्याचे मंत्रालयातील बैठकीत निर्देश

माळशेजच्या पर्यटकांना घेता येणार स्कायवॉकचा आनंद; प्रस्ताव तयार करण्याचे मंत्रालयातील बैठकीत निर्देश

माळशेज घाट या ठिकाणचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा ‘स्कायवॉक’ उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (पीपीपी) तत्त्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

माळशेज घाट हा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नगर या प्रमुख शहरांच्या जवळ आहे. तसेच घाटाच्या जवळच शिवनेरी किल्ला, हरिश्चंद्रगड, विविध धबधबे, पिंपळगाव जोगा धरण आदी पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे स्कायवॉक झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. स्कायवॉक प्रकल्प उभारताना त्यातून ‘इको सेन्सिटिव्ह’ भाग वगळावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

दरम्यान, पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय ही स्वातंत्र्यापूर्वीपासूनची राज्यातील नामवंत अशी शासकीय महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. त्यामुळे येथील ऑडिटोरियमचा पुनर्विकास करताना त्याचा ‘हेरिटेज’ दर्जा कायम राखून तो महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा व्हावा. त्यासाठी तातडीने एकात्मिक विकास आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या पुनर्विकासाबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विद्यार्थी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेत आहेत. येथील ‘महात्मा गांधी सभागृहा’मध्ये (ऑडिटोरियम) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसेच राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु सद्यःस्थितीत या कार्यक्रमांसाठी महात्मा गांधी सभागृहाची आसनक्षमता अपुरी पडत आहे.

या पार्श्र्वभूमीवर बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘या सभागृहात 500 विद्यार्थ्यांची आसनक्षमता आहे. तथापि, या ठिकाणी सुमारे 1500 विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या सभागृहाचा पुनर्विकास करून 1500 आसनक्षमतेचे सुसज्ज सभागृह निर्माण करण्यात यावे.’ यावेळी हेरिटेज वास्तुविशारद आभा लांबा यांनी ऑडिटोरियमच्या पुनविकासाबाबत सादरीकरण केले.

या बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, बी.जे. वैहाकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, हेरिटेज वास्तुविशारद आभा लांबा उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म मुंबईचा. 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सहा-साडेसहा वर्षांचे असतानाच त्यांनी वाडीतल्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा...
आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…
‘लग्न यशस्वी झाले नाही, माझी काय चूक?’, समांथाने घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, आयटम साँग न करण्याचा दिला होता सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबद्दल इमरान हाश्मीचं वक्तव्य; म्हणाला..
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी; 34 लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण पसार
ऐकण्याच्या बाबतही महिला वरचढ, संशोधनातून नवी माहिती समोर