शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य

शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य

उत्तर प्रदेश एका महिलेला तिच्या पतीने त्याच्याच घरात बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व ती आपल्या मुलांसमोर करत होती व त्या मुलांनीच वडिलांना फोन करून घरी बोलावले व आईचं व तिच्या बॉयफ्रेंडचं प्रकरण समोर आलं. या प्रकारानंतर नवऱ्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली असून पोलिसांनी पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना घरातून कामोत्तेजेक औषधे सापडली आहेत. लहान मुलांसमोर अश्लील कृत्य केल्याचा गुन्हा पोलिसांनी या दोघंविरोधात दाखल केला आहे.

उत्तर प्रदेश मधील इटावा शहरातील रेखा (नाव बदलले आहे) हिचे रमेश नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. त्यांनी तीन मुलं होती. रमेश हा आग्र्याला कामाला होता. त्यामुळे तो फक्त शनिवार रविवार घरी यायचा. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रेखाचे रोनक नावाच्या तरुणासोबत सूत जुळले होते. रमेश घरी नसताना रोनक घरी यायचा व रेखासोबत शारीरिक संबंध ठेवायचा. दरम्यान या आठवड्यात नेहमीप्रमाणे रमेश कामासाठी आग्र्याला गेला त्यानंतर रोनक तिच्या घरी आला. मात्र यावेळेस तो परतलाच नाही. रेखा आणि रोनकने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले होते. तीन दिवस झाले रेखा खोलीतून बाहेर येत नव्हती. तिने मुलांसाठी जेवणही बनवले नव्हते. त्यामुळे मुलंही त्रासली होती. अखेर त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने रेखाच्या नवऱ्याला फोन केला. हा प्रकार ऐकून रमेश तत्काळ घऱी आला. घरी येताच त्याला रेखा आणि रोनक नको त्या अवस्थेत दिसले. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने रेखा व रोनकला पकडून ठेवले व पोलिसांना बोलावले . रमेशने रेखा व रोनकविरोधात लहान मुलांसमोर अश्लील प्रकार केल्याची तक्रार दाखल केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यातील मराठी उद्योजकाची बिहारमध्ये हत्या, मिटिंगला बोलावले अन् जाळ्यात अडकवले पुण्यातील मराठी उद्योजकाची बिहारमध्ये हत्या, मिटिंगला बोलावले अन् जाळ्यात अडकवले
बनावट डील करण्याच्या नावाखाली पुण्यातील उद्योगपतीला बिहारमध्ये बोलावून घेतले. पाटणा विमानतळावर उतरताच उद्योगपतीचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून...
सहारा समुहाची अॅम्बी व्हॅलीतील जमीन जप्त
नागपूरमध्ये आज ‘सद्भावना शांती मार्च’
‘ससून’च्या अहवालानंतर ‘दीनानाथ’वर गुन्हा
माहुलच्या घरांसाठी अटी शिथील करणार
नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या एकजुटीचा महानिर्धार, उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन
बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास चीनचा नकार, अमेरिकेच्या टॅरिफला जशास तसे प्रत्युत्तर