‘मंदिराची सुरक्षा वाढवा’, राम मंदिर ट्रस्टसह UP तील अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

‘मंदिराची सुरक्षा वाढवा’, राम मंदिर ट्रस्टसह UP तील अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अयोध्येतील रामजन्मभूमी ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल मिळाल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री हा मेल पाठवण्यात आला होता. ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’, अशी धमकी यातून देण्यात आली होती. हे प्रकरण गांभीर्याने घेत राम मंदिर ट्रस्टने अयोध्येच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

धमकीचा मेल मिळाल्यानंतर अयोध्येतील सुरक्षा एजन्सींनी अलर्ट जारी केला. यासोबतच बाराबंकी, चंदौली सारख्या इतर जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक तपासात हे धमकीचे मेल तामिळनाडूमधून पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. आता सायबर सेलने या मेलची चौकशी सुरू केली आहे, जेणेकरून मेल पाठवणाऱ्याची ओळख पटवता येईल. सध्या अयोध्या, बाराबंकी, चंदौली आणि इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News