Amitabh Bachchan- यांनी का मागितली चाहत्यांची माफी! वाचा सविस्तर
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. अलिकडेच त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांचे लाखो अनुयायी त्यांना सल्ला देऊ लागले. पण त्यापैकी एकही सल्ला काम करत नव्हता, असे मत अमिताभ यांनी व्यक्त केले.
अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, “फॉलोअर्स कसे वाढवायचे याबद्दल मदतीची अनेक उदाहरणे देणाऱ्या सर्वांचे आभार. माफ करा – त्यापैकी एकही उपयुक्त ठरला नाही.” बिग बींच्या या ट्विटवर चाहतेही सतत प्रतिक्रिया देत आहेत. काही तासांतच या पोस्टला 3,500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि सुमारे 700 लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
T 5347 – बड़ी कोशिश कर रहे हैं, लेकिन ये 49M followers का नंबर बढ़ ही नहीं रहा है ।
कोई उपाय हो तो बताइए !!!— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 13, 2025
ग्रोकने बिग बी ना कुठला सल्ला दिला
एका व्यक्तीने XKI ग्रोकला म्हटले, “ग्रोक, कृपया अमित सरांची ही समस्या सोडवा, ते खूप अस्वस्थ आहेत.” यावर ग्रोक म्हणाले, “चला अमित सरांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. परंतु काही सामान्य टिप्स आहेत. प्रथम, ट्रेंडिंग विषयांवर ट्विट करा, जसे की चित्रपटातील गॉसिप किंवा मजेदार मीम्स. दुसरे, जुन्या चित्रपट कथांसारखे नियमित आणि मनोरंजक कंटेंट शेअर करा. तिसरे, चाहत्यांशी थेट बोला, जसे ते आधीच करतात. त्यांच्या विनोदी पोस्ट आधीच हिट आहेत. खरं तर, त्यांचे फॉलोअर्स फक्त त्यांच्या स्टारडम आणि सत्यतेमुळे वाढतात. फक्त आणखी मजा करत रहा, सर.”
बिग बींनी काय ट्विट केले?
14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी लिहिले की, “T 5347- मी खूप प्रयत्न करत आहे, पण 49 दशलक्ष फॉलोअर्सची संख्या वाढत नाहीये. जर काही उपाय असेल तर कृपया मला सांगा.”या ट्विटनंतर त्याच्या पोस्टवर 4,800 हून अधिक कमेंट आल्या. यामध्ये अनेकांनी त्यांना फॉलोअर्स वाढवण्याचा सल्ला दिला, तर अनेकांनी या ट्विटवरून त्यांची खिल्लीही उडवली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List