मुंबईकरांना मल्टी-मॉडल ट्रन्सपोर्टचा फायदा, मेट्रो-मनोरेल जोडणार, मेट्रोची या मार्गावर ‘ट्रायल रन’

मुंबईकरांना मल्टी-मॉडल ट्रन्सपोर्टचा फायदा, मेट्रो-मनोरेल जोडणार, मेट्रोची या मार्गावर ‘ट्रायल रन’

Mumbai Metro:  मुंबई मेट्रोची एक्वा लाइन म्हणजे यलो लाईन २बी मार्गासंदर्भात १६ एप्रिल महत्वाचा दिवस असणार आहे. मेट्रो लाईन २बी मार्गावर उद्यापासून चाचणी होणार आहे. भारतीय रेल्वेच्या १७२व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ट्रायल रन सुरू करण्यात येत आहे. या चाचणीनंतर डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाले (मानखुर्द) या ५.४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. तसेच चेंबूर येथे मनोरेलसोबत मेट्रो जोडली जाणार आहे. या चाचणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यावर हा मार्ग सुरु होणार आहे.

मेट्रोच्या मार्गावर डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले अशी पाच स्थानके आहे. पाच स्थानकांदरम्यान ताशी ८० किमीच्या वेगाने या गाडीची चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीमध्ये रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि ट्रॅकसह एकात्मता चाचणी होणार आहे. त्यानंतर लोडेड ट्रायल घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील मेट्रोचा नवीन मार्ग सुरु होण्याचा मार्ग मोकळा आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर प्रवाशांसाठी सेवा सुरू होणार आहे. तसेच चेंबूर येथे मोनोरेलशी जोडली जाणार असून प्रवाशांसाठी मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टचा फायदा होणार आहे. तसेच मुंबईकरांना या भागातून उन्हाळ्यात मेट्रोतून गारेगार प्रवास करता येणार आहे.

मेट्रोच्या या प्रकल्पाचा एकूण खर्च १०,९८६ कोटी रुपये आहे. सुरुवातीला हा मार्ग २०१९ मध्ये पूर्ण होईल, असे नियोजन केले होते. परंतु या मार्गावरील तांत्रिक अडचणींमुळे मार्ग पूर्ण होण्यास विलंब झाला. आता मेट्रोचा हा संपूर्ण मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत खुला होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो असलेल्या कुलाबा वांद्रे सीप्झ हा मेट्रो ३ संपूर्ण मार्ग ३३.५ किलो मीटरचा आहे. यामध्ये २७ भूमिगत स्टेशन आहेत. या मेट्रो प्रकल्पामुळे वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची गर्दी कमी होईल. सध्या मेट्रोचा हा मार्ग काही प्रमाणात सुरु झाला. त्यावर प्रवाशांची गर्दी कमी आहे. परंतु संपूर्ण मार्ग सुरु झाल्यावर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढणार आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु झाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर...
महाराष्ट्र सरकारच्या ‘ग्रीन वॉश’ला बळी पडू नका; आदित्य ठाकरे यांचा पर्यावरणविरोधी धोरणावरून भाजपसह महायुतीवर घणाघात
Photo – थायलंडच्या समुद्रकिनारी 46 वर्षीय मराठी अभिनेत्रीचा दिसला बोल्ड लूक
रत्नागिरीच्या रनपार समुद्रात बोट बुडाली, 16 जणांना वाचवण्यात यश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का बसला, नेहा खानने हिंदू धर्म स्वीकारला
ठरलं! हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला 29 मे रोजी अंतराळात जाणार
मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणारी खेळाडू इंग्लंडची नवीन कर्णधार, ECB ने केली घोषणा