सुष्मिता सेनची वहिनी तथा अभिनेत्रीवर कपडे विकून जगण्याची वेळ; भावाशी घटस्फोटानंतर होतायत हाल
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याची जशी चर्चा होत असते. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांच्याबाबतीतही तेवढीच चर्चा होताना दिसते. अशीच चर्चा होत आहे सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनबद्दल. तसं पाहायला गेलं तर सुष्मिताचा भाऊ राजीव सेनचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत असतो. विशेषतः त्याची एक्स पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपासोबतच्या त्याच्या नात्याबद्दलच्या चर्चा सुरुच असतात.
ऑनलाईन कपडे विक्रीचा बिझनेस
चारुने सुष्मिता सेनच्या भावाशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगीही आहे जिचं नाव जियाना आहे. दोघांनी जून 2019 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांनंतर म्हणजे 8 जून 2023 रोजी त्यांचा घटस्फोट झाला चारु आणि राजीव यांचा घटस्फोट झाला. मात्र आता चारुवर जियानाला घेऊन मुंबई सोडण्या वेळ आली. ती मुलीला घेऊन बिकानेरला शिफ्ट झाली आहे. तिथे ती ऑनलाईन कपडे विक्रीचा बिझनेस करत आहे. चारुचा कपडे विकतानाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला ज्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. चारु आर्थिक संकटात असल्याचा अंदाज अनेकांनी लावला आहे. चारू कपडे विकून आणि तिच्या मुलीला वाढवून आपला उदरनिर्वाह करत आहे. ही बातमी समोर येताच सुष्मिता सेनच्या कुटुंबाला ट्रोलही करण्यात आलं होतं.
मुंबईत भाड्याच्या घरात राहणं परवडायचं नाही
चारू आधी मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. पण मुंबईत भाड्याच्या घरात राहायचं म्हटलं तरी मोठी रक्कम मोजावी लागते. अगदी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटीही मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. सेलिब्रिटींना ऐसपैस घर हवं असल्याने ते दीड-दोन लाखही भाडंही भरतात. मात्र नुकतंच चारूला हे भाडं परवडत नसल्याने तिने मुंबई सोडली आणि ती लेकीला घेऊन थेट बिकानेरला शिफ्ट झाली आहे. एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे, ती म्हणाली, “मी माझ्या गावी बिकानेरला आले आहे. मी मुंबई सोडली आहे आणि आईबाबांसोबत राहत आहे. जियाना आणि मी एक महिन्यापूर्वीच इथे आलो आहोत. मुंबईत राहणं सोपं नाही. खूप पैसे लागतात. मला महिन्याला एक ते दीड लाख रुपये खर्च यायचा. जेव्हा मी नायगावला शूटिंग करत होते तेव्हा जियानाला एकटीला नॅनीसोबत सोडू शकत नव्हते. हे फारच कठीण होतं. बिकानेरला येऊन स्वत:चं काम सुरु करायचं हे मी प्लॅन केलं होतं. हा घाईघाईत घेतलेला निर्णय नाही.”
लेकीला घेऊन माहेरी राहण्याचा निर्णय
तसेच ती पुढे म्हणाली “जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन व्यवसाय सुरु करता तेव्हा संघर्ष करावाच लागतो. मी तरी कुठे वेगळी आहे? ऑर्डर घेण्यापासून ते स्टॉक मागवणं, पोहोचवणं सगळं मीच करत आहे. या बिझनेसमुळे मला माझ्या मुलीकडेही लक्ष देणं शक्य होत आहे. तसंच चारुचे वडील कधीही बिकानेरला तिला भेटायला येऊ शकतात.” चाहत्यांनी तिच्या या धाडसी निर्णायचं कौतुक करत तिला तिच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. मात्र यावर राजीव सेनने उलट प्रतिक्रिया देत तिच्यावरच आरोप केले आहेत.
राजीव सेनचे पत्नी चारूवरच आरोप
राजीव सेन याने एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की, ‘माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी चारू हे सर्व करत आहे. मला माझ्या मुलीसाठी, जियानासाठी खूप वाईट वाटतं, कारण या सगळ्याचा सर्वात जास्त परिणाम तिच्यावर होतोय. मला खात्री आहे की तिलाही माझी तितकीच आठवण येत असेल जितकी मला तिची आठवण येत असेल. मी कामासाठी दिल्लीला गेलो होतो, म्हणून मी चारूला विचारलं की मी जियानाला भेटण्यासाठी बिकानेरला येऊ शकतो का? पण तिने मला कोणतंही उत्तर दिलं नाही. आता ती सर्वांना सांगत आहे की तो बिकानेरला येऊ शकतो. आता यावर मी काय बोलावं?” असं म्हणत त्याने चारूवरच आरोप केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List