‘मी जेवणाशिवाय राहू शकते पण सेक्सशिवाय नाही’, प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक वक्तव्य
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेण्यात सर्वांनाच उत्सुकता असते. त्यांचे अफेअर्स, लग्न, घटस्फोट, या सर्व गोष्टींची चर्चा ही होतच असते.तसेच त्यांच्या चित्रपटांपासून ते त्यांच्या बोल्ड सीनपर्यंत त्यांची चर्चा होत असते. पण कधी कधी सेलिब्रिटींच्या बोल्ड वक्तव्याचीही तेवढीच चर्चा होते त्यासाठी त्यांना तेवढं ट्रोलही केलं जातं. विशेषत: अभिनेत्रींच्या वक्तव्याची चर्चा तर नेहमीच होते.
समांथाने केलेलं बोल्ड वक्तव्य
अशा काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या याच स्पष्टवक्तपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी कधी तर त्यांच्या काही वक्तव्यांमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशीच एक अभिनेत्री तिच्या एका बोल्ड वक्तव्यामुळे आत चर्चेत आली आहे पण तिला यासाठी ट्रेलही केलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे साऊथ क्विन अभिनेत्री समांथा प्रभू. समांथा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिचं लग्न ते तिचा घटस्फोट याबाबत तिच्याबद्दल नेहमीच चर्चा होतच असतात. पण आता तिचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
“अन्नाऐवजी सेक्सची निवड करेन…”
एका फोटोशूट दरम्यान मुलाखत घेत असताना समांथाला एका पत्रकाराने एक अनपेक्षित प्रश्न विचारला, “तुला जर सेक्स आणि जेवण यामध्ये एक निवडायचं असेल, तर काय निवडशील?” यावर समांथाचं उत्तर अनेकांसाठी धक्कादायक ठरलं. तिने बिनधास्तपणे उत्तर दिलं, “मी एक दिवस उपाशी राहायला तयार आहे. पण सेक्सशिवाय…त्यामुळे अशा प्रसंगी मी अन्नाऐवजी सेक्सची निवड करेन.” समांथाचं उत्तर अनेकांसाठी धक्कादायकच होतं. तिचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यावरून तिला लोकांनी ट्रोलही केलं होतं.
समांथाच्या वक्तव्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती
समांथाने केलेलं हे वक्तव्य जून्या मुलाखतीमधलं आहे. नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर आणि विशेषत: त्याने दुसरं लग्न केल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडीओ, बातम्या व्हायरल होताना दिसतात. त्यातच तिने केलेलं हे वक्तव्यही पुन्हा एकदा व्हायरल झालं. समांथा अभिनेता नागार्जुनची सून आणि नागा चैतन्यची पत्नी असताना हे बोल्ड वक्तव्य केलं होतं. जे आता पुन्हा एकदा चर्चेत आलं. समांथाच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती.
सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली
या विधानानंतर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती. काही लोकांनी तिचं समर्थन केलं तर काहींनी तिला ट्रोल केलं. पण समांथाने नेहमीप्रमाणेच आपली मतं ठामपणे मांडली आणि कुठेही मागे हटली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List