Hair Care- केसांच्या घनदाट वाढीसाठी ‘या’ तेलाने रोज पाच मिनिटे मालिश करा! केसांची वाढ बघून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल
आपल्या हिदुस्थानी संस्कृतीमध्ये विविध प्रकारची खाद्यपरंपरा पाहायला मिळते. प्रत्येक 10 मैलावर भाषा बदलते. तसाच खाद्यसंस्कृतीमध्येही फरक पाहायला मिळतो. हिंदुस्थानच्या काही भागात मोहरीच्या तेलाचा वापर हा खाण्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक भागाच्या वातावरणाप्रमाणे खाण्यामध्येही तशाच पदार्थांचा आणि वस्तूंचा समावेश होतो. मोहरीचे तेल म्हटल्यावर आपण नाक मुरडतो, परंतु हे तेल आरोग्यदायी तर आहेच. शिवाय सौंदर्यवर्धक सुद्धा आहे. या तेलातील पोषक तत्त्वामुळे त्वचा, शरीराचे पोषण होते. त्याचबरोबर त्वचा, केसांसंबंधीच्या समस्याही दूर होण्यास मदत होते.
जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचे सौंदर्यवर्धक फायदे
त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचाही उजळेल.
केस रुक्ष होणे, खाज, कोंडा यांसारख्या केसांच्या समस्येवर मोहरीचे तेल गुणकारी ठरते. आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करुन त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पूने धुवा. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल व केस चमकदार होतील.
मोहरीच्या तेलाने रॅशेस पासून सुटका होते. यात अंटी फंगल आणि अंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर होणारे रॅशेस दूर होतात. यासाठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून त्वचेवर मसाज करावा. अतिशय उपयुक्त आणि गुणकारी असा हा तोडगा आहे.
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण नानाविध क्रिमचा वापर करतो. पण अनेकांना हे ठाऊक नाही की, सनबर्न या समस्येपासून वाचण्यासाठी मोहरीच्या तेलाशिवाय दुसरा परिणामकारक उपाय नाही. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ई असल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते तसेच त्वचेवरील सुरकुत्यांवर परिणामकारक ठरते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List