Kerala मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, निवासस्थान, कोची विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचे कार्यालय आणि त्यांचे अधिकृत निवासस्थान, क्लिफ हाऊस, हे दोन्ही राज्याच्या राजधानीत आहेत. ही ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आज सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी सर्व परिसराची तपासणी करण्यासाठी बॉम्ब पथके तैनात केली असून तपास सुरू आहे.
मुख्यमंत्री कार्यालय आणि तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानावर बॉम्बची धमकी ईमेलद्वारे मिळाली. यानंतर तात्काळ कारवाई करत केरळ पोलिसांनी या ठिकाणी तपास सुरू केला. स्निफर डॉग आणि विशेष पथकांसह, कसून तपासणी सुरू आहे. तसेच आतापर्यंत, दोन्ही ठिकाणी कोणतेही स्फोटके आढळली नाहीत.
विमानतळावर बॉम्बची धमकी!
सकाळी 07.53 वाजता [email protected] या ईमेल आयडीवरून [email protected] या ईमेलद्वारे पाठवण्यात आली, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की ‘CIAL मध्ये गुप्तपणे RDX-आधारित स्फोटक उपकरण ठेवले गेले आहे! दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व रिकामे करा!’
विमानतळाच्या बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीची (BTAC) सकाळी 8.55 वाजता बैठक बोलावण्यात आली आणि तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या. CISF ने सर्व टर्मिनल्सवर तोडफोड विरोधी तपासणी केली, तर राज्य पोलिसांनी शहराच्या बाजूला अशाच प्रकारची तपासणी सुनिश्चित केली.
सर्व उड्डाणांसाठी सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले. त्यानंतर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (CIAL) ने राज्य पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List