जमीन घोटाळ्यात AI इमेज रि-शेअर करणाऱ्या IAS अधिकाऱ्याची बदली

जमीन घोटाळ्यात AI इमेज रि-शेअर करणाऱ्या IAS अधिकाऱ्याची बदली

हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीजवळील 400 एकर जमिनीवरील झाडे तोडल्याबद्दल AI च्या मदतीने बनवलेली घिबली इमेज सोशल मीडियावर रि-शेअर केल्याबद्दल पोलिसांनी अलिकडेच समन्स बजावलेल्या वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी स्मिता सभरवाल यांची बदली करण्यात आली आहे. रविवारी तेलंगणा सरकारने बदली केलेल्या 20 अधिकाऱ्यांमध्ये स्मिता सभरवाल यांच्या नावाचा समावेश आहे.

आठवड्यापूर्वी सायबराबाद पोलिसांसमोर हजर झालेल्या सभरवाल यांनी ‘selective targeting’ म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 2001 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या सभरवाल यांनी विचारले होते की, हीच पोस्ट पुन्हा शेअर करणाऱ्या 2000 व्यक्तींविरुद्ध अशीच कारवाई करण्यात आली आहे का?

सभरवाल या सध्या युवा प्रगती, पर्यटन आणि संस्कृती (YAT&C) च्या विशेष मुख्य सचिव आणि पुरातत्व संचालक म्हणून काम पाहात होत्या. आता तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये YAT&C मध्ये बदली होण्यापूर्वी त्या या पदावर होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या सचिव म्हणून काम पाहणाऱ्या सभरवाल या मागील BRS सरकारमध्ये एक प्रबळ अधिकारी होत्या. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर, त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून (CMO) बाहेर काढून तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

सभरवाल यांच्यासह 20 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय
सवाई मानसिंग स्टेडियमवर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच वादळ गोंगावलं आणि राजस्थानने गुजरातचा 25 चेंडू राखत 8 विकेटने पराभव केला. वैभवने...
हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली भिती
IPL 2025 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत झळकावले शतक
उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वांत मोठा धक्का, बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!
‘कहानी ते मर्दानी’ महिला अभिनेत्रींचा ठसा कायम, तिकीटबारीवरही खणखणाट
भाजीसाठी मोठा बटाटा घेतल्याने पतीला राग अनावर, कुऱ्हाडीने वार करत पत्नीची हत्या
कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ईडी तपास बंद; दिल्ली कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला