नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

शहरातील नद्यांवर नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. रविवारी पुन्हा नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी काढलेल्या पदयात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामठे उद्यान ते पिंपळे निलख स्मशानभूमीजवळील नदीपात्रापर्यंत नागरिक व पर्यावरणप्रेमींनी पदयात्रा काढली. नदीकाठी गेल्यानंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नदी सुधार योजनेअंतर्गत झालेल्या वृक्षतोडीमुळे गतप्राण झालेली झाडे, अधिवास नष्ट झाल्यामुळे प्राण गमावलेल्या पशु पक्ष्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नदी सुधार प्रकल्प राबवताना नदीकाठची सुमारे 40 हजार झाडे तोडली अथवा पुनर्रोपणाच्या नावाखाली मारली जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्प राबवताना नदीचे नैसर्गिक पात्र, जैवविविधता आणि नदी प्रदूषणमुक्ती या बाबींवर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. पर्यावरणप्रेमींशी चर्चा करून नदीपात्राची बनसोडे यांनी पाहणी केली. नदी सुधार योजनेच्या नावाखाली होत असलेली बेकायदेशीर वृक्षतोड चुकीची आहे. नदीकाठी भराव टाकल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम तत्काळ थांबविण्याच्या सूचना बनसोडे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिल्या. या कामाची चौकशी करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर नदी सुधार प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अण्णा बनसोडे यांनी दिले. शहरात सातत्याने बेकायदेशीरपणे वृक्षतोड होत असून अनेक प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झाल्याचे बनसोडे यांना सांगण्यात आले. त्याबाबत बोलताना बनसोडे म्हणाले, ‘अवैधपणे वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय
सवाई मानसिंग स्टेडियमवर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच वादळ गोंगावलं आणि राजस्थानने गुजरातचा 25 चेंडू राखत 8 विकेटने पराभव केला. वैभवने...
हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली भिती
IPL 2025 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत झळकावले शतक
उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वांत मोठा धक्का, बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!
‘कहानी ते मर्दानी’ महिला अभिनेत्रींचा ठसा कायम, तिकीटबारीवरही खणखणाट
भाजीसाठी मोठा बटाटा घेतल्याने पतीला राग अनावर, कुऱ्हाडीने वार करत पत्नीची हत्या
कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ईडी तपास बंद; दिल्ली कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला