आपलं लक्ष आता BMC, पोलादी वज्रमुठीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांची गर्जना

आपलं लक्ष आता BMC, पोलादी वज्रमुठीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांची गर्जना

आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका, पोलादी वज्रमुठीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. साळवींची सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर भेटीला गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सुधीर साळवी यांना सचिवपद दिलं आहे. लालबाग, परळ आणि वरळी म्हटल्यानंतर कट्टर शिवसैनिक हा आलाच. काल, परवा बातम्याही आल्या की, उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी केली. आमच्या खेळी मोठ्याच असतात. आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे. त्यासाठी मी सुधीर यांना शिवसेनेचं सचिवपद दिलं आहे. सुधीर यांना आता मी आणखी मुंबईमध्ये इकडं, तिकडं सगळीकडे पळवणार आहे. सगळ्यांनी साथ, सोबत द्यावी आणि असेच सगळे आनंदी राहा. सगळे एकत्र आहात, आनंदात आहात, असेच आनंदात राहा. एकजुटीने राहा. आपल्यावरती जे काही एक वेगळं संकट आलं आहे, केवळ शिवसेनेवरती नाही तर, महाराष्ट्रावरती, मुंबईवरती आणि मराठी अस्मितेवरती येत आहे, ते चिरडून टाकण्यासाठी म्हणून आपली एकजूट पाहिजे. मला खात्री आहे, तुम्ही त्या पोलादी वज्रमुठीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! वाल्मिक कराडला काम संपल्यावर मारण्याचा प्लान?; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ मोठी बातमी ! वाल्मिक कराडला काम संपल्यावर मारण्याचा प्लान?; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरूंगात कैद आहे. कराड आणि त्याच्या गँगचे अनेक...
लाडक्या बहीण योजनेबाबत संजय राऊत यांचा दावा काय? राऊत म्हणाले, आता नवा वाद…
गोविंदाला घटस्फोट देण्याबद्दल पत्नी सुनिताची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाली, “तू जरा जास्तच..”
Divyanka Tripathi Divorce Rumoures : टीव्हीच्या आणखी एका सुनेचा संसार मोडणार ? दिव्यांका त्रिपाठीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने असं दिलं उत्तर; ट्रोलर्सची बोलतीच बंद
‘अखेरच्या श्वासापर्यंत तिच्यासाठी भांडेन..’; ऐश्वर्याबद्दल ‘ती’ बातमी देणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी सुनावलं
‘लाज वाटली पाहिजे त्या लोकांना…’, Nisha Rawal ने ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, व्हिडीओमुळे वाद