मुंबईच्या निसर्गरम्य मलबार हिल नेचर ट्रेलला भेट देण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
मुंबईतील मलबार हिल इथला बहुचर्चित असा निसर्ग उन्नत मार्ग (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) हा सध्या अनेकांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे. आतापर्यंत तुम्ही या नेचर ट्रेलरचे विविध रील्स आणि व्हिडीओ पाहिलेच असतील. हे रील्स पाहून तिथे भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यापूर्वी या काही खास गोष्टी लक्षात ठेवा..
या एलिव्हेटेड नेचर ट्रेलची लांबी एकूण 485 मीटर आणि रुंदी 2.4 मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी 'सी व्ह्युईंग डेक' देखील बांधण्यात आला आहे.
पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी याठिकाणी प्रवेश नियंत्रण प्रणाली (एक्सेस कंट्रोल सिस्टिम) विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाइन स्लॉटची बुकिंग करावी लागेल.
https://naturetrail.mcgm.gov.in/ या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा स्लॉट बुक करू शकता. इथं भेट देण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी 9 वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आहे. संध्याकाळच्या सौम्य रोषणाईत हा नेचर ट्रेल आणखीनच सुंदर दिसतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List