ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, अभिषेक आणि निम्रतचा पार्टीत स्टायलिश एन्ट्री, व्हिडीओ तुफान व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला असताना, अभिषेक आणि अभिनेत्री निम्रत कौर यांना एकाच पार्टीत स्पॉट करण्यात आलं. दोघांनी देखील पार्टीसाठी काळ्या रंगाचा लूक कॅरी केला होता. मॅडॉक फिल्म्सच्या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते, पण सर्वांच्या नजरा अभिषेक आणि निम्रत यांच्यावर येवून थांबल्या. सध्या सोशल मीडियावर दोघांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
सांगायचं झालं तर, ‘दसवी’ सिनेमात अभिषेक आणि निम्रत यांनी एकत्र भूमिका साकारली होती. सिनेमात निम्रत हिने अभिषेक याच्या पत्नीची भूमिका साकारली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. एवढंच नाही तर, जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या तेव्हा यासाठी निम्रत हिला जबाबदार ठरवण्यात आलं होतं.
दरम्यान, पुन्हा मॅडॉक फिल्मच्या पार्टीमध्ये अभिषेक आणि निम्रत यांना स्पॉट करण्यात आलं. पार्टीमध्ये दघांनी एकत्र एन्ट्री केली नसली तरी, दोघांच्या स्टायलिश एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेत – निम्रत यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
मॅडॉक फिल्मच्या पार्टीमध्ये अभिनेत्री सारा अली खान भाऊ इब्राहिम अली खान याच्यासोबत पोहोचली. सारा आणि इब्राहिम यांचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
मॅडॉक फिल्म्सने पूर्ण केले 20 वर्ष…
मॅडॉक फिल्म्सच्या पार्टीमध्ये राजकुमार राव, कृती सनॉन, राधिका मदान, रश्मिका मंदाना, श्रद्धा कपूर आणि टिस्का चोप्रा यांच्यासोबत अन्य सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. मॅडॉक फिल्म्स गेल्या 20 वर्षांपासून हीट सिनेमांची निर्मिती करत आहे. ‘छवा’ हा 2025 मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिंदी सिनेमा ठरल्यानंतर मॅडॉक फिल्म्सच्या शानदार बॉक्स ऑफिस यशानंतर हे सेलिब्रेशन सुरू झालं आहे. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’, ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री 2’ सारखे हिट आणि ब्लॉकबस्टर सिनेमे मॅडॉक फिल्म्सने दिले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List