अमिताभ बच्चन यांनी रेखाला सेटवर सर्वांसमोर जोरदार थप्पड का लगावली होती?
एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा तर आजही होतात. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे नाते एका चित्रपटाच्या सेटवर सुरू झाले. एकत्र काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण अमिताभ बच्चन हे आधीच विवाहित असल्याने त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. कारण जेव्हा जया बच्चन यांना रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल समजले होते तेव्हा त्यांनी रेखाला बरंच काही सुनावलं होतं असंही म्हटलं जातं. पण एकदा अमिताभ आणि रेखा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्यांच्यातही काहीतरी घडलं आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी रेखाला सर्वांसमोर ठिकाणी थप्पड लगावली होती.
अन् रेखाला शूटिंग सेटवरच सर्वांसमोअनेक थप्पड मारल्या
रेखा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात वेडी झाली होती. दोघांमधील नात्याची सर्वत्र चर्चा होत होती. तेव्हा अमिताभ ‘लावारीस’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी चित्रपटात बिग बींसोबत एक इराणी डान्सर देखील काम करत होती. अशा परिस्थितीत, सेटवर अफवा पसरली की बिग बी या इराणी डान्सरच्या प्रेमात आहेत. आणि ही अफवा जेव्हा रेखाच्या कानावर गेली तेव्हा तिला वाटले की अमिताभ तिला फसवत आहेत. अशा परिस्थितीत ती लगेचच चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि अमिताभ यांना खूप काही ऐकवू लागली होती. रेखाने बरंच काही ऐकवल्यानंतर अमिताभ यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी रेखाला शूटिंग सेटवरच सर्वांसमोअनेक थप्पड लगावल्या असं म्हटलं जातं. अमिताभच्या या वागण्याने रेखाला धक्का बसला होता आणि ती जोरजोरात रडू लागली.
जया बच्चन यांना अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील नात्याबद्दल कळले तेव्हा
यानंतर रेखा अमिताभ यांच्यावर रागावली आणि तिने ‘सिलसिला’ चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. ‘सिलसिला’चे निर्माते रेखाच्या निर्णयावर खूप नाराज होते. चित्रपटासाठी त्यांनी अमिताभ आणि जया बच्चन यांना कास्ट केले होते. जेव्हा जया बच्चन यांना अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील नात्याबद्दल कळले तेव्हा त्यांनी एक युक्ती खेळली. जेव्हा अमिताभ बच्चन घरी नव्हते, तेव्हा जयाने रेखाला जेवणासाठी आमंत्रित केले आणि त्यांच्यात एक संवाद झाला त्यात त्यात ते रेखाला थेट म्हणाल्या की मी अमितला कधीही सोडणार नाही. जयाकडून हे ऐकल्यानंतर रेखाला समजले होते की ती आणि अमिताभ कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत. त्यानंतर रेखा बिग बींपासून दूर झाली.
पण आजही त्यांच्या अफेअरच्या चर्चा होतात. तसेच रेखा अजूनही अमिताभ यांच्यावर प्रेम करते आणि त्यांच्या नावाचे मंगळसुत्र आणि सिंदूर लावते असं म्हटलं जातं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List