ट्रेंडची सटकली! घिबलीने फोटोची वाट लावली!! लग्न न झालेल्या जोडप्यांना मुले दाखवली
सध्या सोशल मीडियावर घिबली ट्रेंड जोरात सुरू आहे. लाखो लोक ऊठसूट घिबली फोटो बनवत आहे. त्यामुळे ओपनएआयवर प्रचंड लोड येत आहे. छोट्या मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांना घिबलीने भुरळ घातली आहे. अनेक जण वेगवेगळे फोटो घिबली स्टाईलने बनवत आहेत. त्यामुळे ओपनएआयवर कामाचा ताण वाढला असून त्यांच्याकडून चुका होत असल्याचे दिसत आहे. यात काही लोकांचे फोटो घिबली स्टाईल चुकवत आहे.
घिबलीच्या चुकीच्या फोटोमध्ये काही लोकांना दोन हाताऐवजी तीन हात दिसत आहेत. काही लोकांचे फोटो वेगळेच दिसत आहेत, तर काही ठिकाणी फोटोचे बॅकग्राऊंड खऱ्या फोटोच्या बॅकग्राऊंडपेक्षा वेगळे दाखवले जात आहेत. काही फोटोमध्ये तर दोन पती आणि दोन पत्नीसुद्धा दाखवले आहेत. ज्यांचे लग्न झाले नाही अशा जोडप्यांना मुले दाखवण्याचा कारनामा घिबली स्टाईल फोटो करत आहे.
घिबलीकडून चुकीचे फोटो कसे काय बनवले जातात, असा प्रश्न चॅटजीपीटीवर विचारण्यात आला त्यावेळी चॅटजीपीटीकडून आलेले उत्तर मजेशीर आहे. एआय मॉडलला लाखो फोटो बनवण्याची ट्रेनिंग दिली जाते, परंतु कधी कधी छोट्या गोष्टी समजण्यात एआय सक्षम ठरत नाही. त्यामुळे एआयकडून यासारख्या चुका होतात, असे उत्तर आले. या सर्व चुका डेटा प्रोसेसिंग, एआय मॉडलचे परफेक्शनमधील कमीमुळे चुकीचे फोटो बनवले जात आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List