राज ठाकरे यांनी मराठीसाठी सुरु केले आंदोलन थांबवले, संजय राऊत यांची एका वाक्यात प्रतिक्रिया

राज ठाकरे यांनी मराठीसाठी सुरु केले आंदोलन थांबवले, संजय राऊत यांची एका वाक्यात प्रतिक्रिया

Sanjay Raut on Raj Thackeray: मनसे नेते राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी बोलले जात नसल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरु करण्याचे आदेश गुढीपाडवा मेळाव्यात दिले होते. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी बँकांमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले होते. आता दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पत्र काढून आंदोलन थांबवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊत यांनी एका वाक्यात त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘तुम्हालाही माहीत आहे. आम्हालाही माहीत आहे. त्यात काय चालतेय.’

काय म्हणाले संजय राऊत?

खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर बोलताना सांगितले की, अमेरिकेप्रमाणे भारतात रस्त्यावर लोक उतरणार आहे. त्याठिकाणी ट्रम्प यांच्याविरोधात लोक जसे रस्त्यावर उतरले आहे तसे भारतात होईल. अमेरिकेच्या ५० राज्यांत लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. तसाच प्रकार देशातील लोकशाही वाचवण्यासाठी भारतात लोक करतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले.

शेअर बाजार सोमवारी तीन हजार अंकांनी कोसळला. त्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, बाजार कोसळत असताना मोदी विदेशात फिरत आहे. त्यांचे अंध भक्त कौतूक करत आहे. वक्फ बोर्डाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. परंतु त्यात आज मुस्लमांची संपत्ती गेली. उद्या ख्रिश्चिन लोकांची संपत्ती जाईल. त्यानंतर बौद्ध, जैन लोकांची संपत्ती जाईल. देवस्थांनांच्या जमीनीवर यांचा डोळा आहे, असे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी म्हटले आहे, ते सत्य आहे.

या विधेयकाविरोधात इंडिया आघाडीतील काही लोक कोर्टात गेले आहेत.  उद्या हे लोक बुध्दगयावर दावा करतील. भाजपचे लोक चैत्याभूमीवर जातील हे तिथेही दावा सांगतील. संसेदत आम्ही या बिलाविरोधात आम्ही मतदान केले आहे. कारण हे विधेयक जमिनीसाठी आणले आहे. या जमिनी आपल्या उद्योगपतींना टॉवर बांधण्यासाठी देतील, असा दावा राऊत यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रतन टाटांच्या बंगल्यावर कुणाचा हक्क? 13 हजार चौरस फुटांच्या बंगल्यात कोण राहणार? रतन टाटांच्या बंगल्यावर कुणाचा हक्क? 13 हजार चौरस फुटांच्या बंगल्यात कोण राहणार?
Ratan Tata Bungalow: दिवंगत रतन टाटा यांच्या कुलाबा येथील समुद्रकिनारी असलेल्या त्यांच्या बंगल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. रतन टाटा यांनी...
शिक्षकी पेशाला काळिमा, घरचा अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
मासिक पाळी आल्याने विद्यार्थीनीला वर्गाबाहेर काढले, जमिनीवर बसून लिहायला लावला पेपर
बैलजोडी जप्त करतो; शेतकऱ्याला धमकी देत अधिकाऱ्यांनी घेतली 200 रुपयांची लाच, Video व्हायरल
बॉयफ्रेंडसोबत पळून गेली म्हणून बापानेच मुलीला संपवलं, घरातल्या बाथरूममध्ये लपवलेला मृतदेह
ट्रायल शो दरम्यान दुर्घटना, हॉट एअर बलूनची दोरी तुटली; जमिनीवर पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
Air India – विमान लँड होताच पायलटला हृदयविकाराचा झटका, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटना