कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video
अभिनेता कार्तिक आर्यन आणि श्रीलीला ही जोडी सध्या चर्चेत आहे. त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट संदर्भात दोघेही बिझी आहे. त्यांच्यात अफेअर सुरु असल्याची देखील चर्चा सुरु आहे. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अलिकडेच दोघांचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे तो पाहून चाहते शॉक्ड झाले आहे.या व्हिडीओत आपण पाहू शकता की कार्तिक आर्यन पुढे पुढे चालत आहे तर त्याच्या मागून श्रीलीला चालत येत आहे. या दरम्यान एक चाहता श्रीलीला हीचा हात पकडून तिला खेचताना दिसत आहे. आणि कार्तिकला याचा थांगपत्ताही लागत नाही. नंतर सिक्युरिटी गार्ड्स या चाहत्यांच्या तावडीतून श्रीलीला हीची कशीबशी सुटका करताना दिसत आहेत…
व्हिडिओत काय आहे?
कार्तिक आणि श्रीलीला यांचा हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे कळायला काही मार्ग नाहीए…परंतू व्हिडीओतील हे दृश्य पाहून थरकाप उडत आहे. मोठ्या गर्दीच्या ठिकाणातून कार्तिक आर्यन आणि श्रीलीला एका चिंचोळ्या जागेतून मार्गक्रमण करताना दिसत आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झटापट सुरु आहे. कार्तिक पुढे पुढे जात आहे. तर त्याच्या मागू श्रीलीला चालत येताना दिसत आहे. या दरम्यान एक इसम श्रीलीला हिच्याशी हात मिळविण्यासाठी त्याचा हात पुढे करतो..आणि श्रीलीला देखील हात पुढे करते त्यानंतर तो इसम तिचा हात सोडतच नाही आणि तिला गर्दीत खेचून नेताना दिसत आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
तर अभिनेता कार्तिक याला मागे श्रीलीला हिच्यासोबत काय झाले हे कळतच नाही तो सरळ पुढे पुढे चालत जाताना दिसत आहे. सिक्युरिटीच्या मदतीने श्रीलीला हिला कसेबसे वाचवले जाते. यावेळी श्रीलीला हीच्या चेहऱ्यावर या घटनेचा ताण स्पष्ट दिसत आहे. नंतर पुन्हा ती स्वत:ला सावरते आणि पुन्हा जसे काही झाले नाही अशा पद्धतीने चालताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.चाहते या व्हिडीओवर निरनिराळ्या कमेंट्स करीत आहेत.
व्हिडिओवर चाहते काय म्हणतायत?
जो पण या व्हिडीओला पाहात आहे तो शॉक्ड होत आहे.काही जण याला गंभीर प्रॉब्लेम म्हणत आहेत. तर काही जण कार्तिक याच्या निष्काळजीपणा आणि बेफिकरीबद्दल बोलत आहेत. एका युजरने लिहीलेय की काय असे होऊ शकते. एका अन्य युजरने लिहीलेय की कार्तिक याला काही फरक पडत नाहीए….अन्य एका युजरने म्हटलेय की ज्याने असे केले त्याला शिक्षा मिळायला हवी आहे. कार्तिक आणि श्रीलीला यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते ज्या चित्रपटावर काम करीत आहेत त्याचे दिग्दर्शन अनुराग बसू करीत आहेत. फिल्मचा पहिला लूक आणि एक गाणे देखील आले आहे. या चित्रपटाला आशिकी चित्रपटाचा तिसरा भाग म्हटले जात आहे. या फिल्मचे टायटल अजून घोषीत झालेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List