महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीच गरज नाही,काय म्हणाले एकनाथ खडसे?
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर सनसनाटी आरोप केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा सनसनाटी आरोप एका पत्रकाराच्या हवाल्याने एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी संतापाने खडसे यांनी पुरावा सादर करावा मी राजकारण सोडून देईन, परंतू खडसे यांच्या बाबत त्यांच्या घरातीलच एक गोष्ट सांगितली तर त्यांना तोंड काळ करुन फिरावे लागेल असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीही गरज नाही असे म्हटले आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यात विस्तव जात नाही. दोघेही एकमेकांविरोधात सातत्याने टीकात्मक बोलत असतात. गिरीश महाजन यांचे महिला आयएएसशी संबंध असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन संतप्त झाले आहेत. खडसे यांनी एकही पुरावा दिल्यास मी राजकारण सोडायला तयार आहे असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच कोणा भोंदू पत्रकाराच्या हवाल्याने एकनाथ खडसे काहीही बोलत आहेत. त्यांच्या बाबतीत त्यांच्या घरातीलच एक गोष्ट मी सांगणार नाही. पण सांगितली तर ते तोंड काळे करुन फिरतील असे गिरीश महाजन यांनी पलटवार करताना म्हटले आहे.
शहांकडे या संदर्भातला सीडीआर उपलब्ध आहे
आपल्यावर एकनाथ खडसे यांनी वैयक्तिक आरोप केल्याचे म्हणत गिरीश महाजन संतापले आहेत. त्यांनी पुरावा द्यावा असेही गिरीश महाजन यांनी खडसे यांना म्हटले आहे. आता यावर एकनाथ खडसे यांनी उगाचंच गिरीश महाजन यांनी माझं नाव घेऊन आदळ आपट करण्याची गरज नाहीए असे म्हटले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर मी आरोप केला नव्हता, तर गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी तो केला असून त्यात त्यांनी अमित शहा यांचा सुद्धा उल्लेख केला आहे. अमित शहा यांच्याकडे या संदर्भातला सीडीआर उपलब्ध आहे असे सुद्धा एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले.
असा आरोप मी केलेला नाही, पत्रकाराने केलाय
त्यांना पुरावे मागायचे असतील तर त्यांनी पत्रकार अनिल थत्ते यांच्याकडे मागावेत, एकनाथ खडसे यांच्याकडे कशाला पुरावे मागतात.अनिल थत्ते यांनी जे म्हटलं आहे, त्यात सत्य आहे का नाही आहे हे तुम्ही शोधा. अनिल थत्ते यांच्यावर कारवाई करायची असेल तर तुम्ही करा. नाथाभाऊचं नाव तुम्ही कशाला घेता, कारण यापूर्वी नाथाभाऊनी तुमच्यावर आरोप कधी केले नाहीत. महिला IAS अधिकारी सोबत तुमचं कधी बोलणं झालं आहे असा आरोप मी कधी केलेला नाही. पत्रकाराचा हवाला देऊन मी बोललो होतो. अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List