40 वर्षाच्या अंकिता लोखंडेला थेट आलियाच्या आईच्या रोलसाठी विचारलं, अंकितानेही दिलं सडेतोड उत्तर
टीव्ही इंडस्ट्रीतील सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अर्थातच अंकिता लोखंडे. अंकिता लोखंडेनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेत आधी तिने पत्नी, सून आणि नंतर आईची भूमिका साकारली. ती प्रेक्षकांनाही तेवढीच भावली.अंकिता आता जास्त करून रिअॅलिटी शोमध्येच दिसते. तिच्यासोबतच तिचा पती विकी जैनदेखील असतो. तसेच अंकिता सोशल मीडियाद्वारेही आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या घरी होणाऱ्या पार्टी आणि कार्यक्रम यांचे फोटो, व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अंकिता लोखंडेला थेट आलियाच्या आईच्या रोलसाठी विचारलं
दरम्यान, सध्या अंकिता लोखंडेचा असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात एल्विश यादव हा अंकिताला आलिया भट्टच्या आईची भूमिका करशील असं विचारताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एल्विश यादवच्या पॉडकास्टमधील आहे. एल्विश यादव अंकिता लोखंडेला म्हणतो की ‘विकिपीडियावर तुझं वय हे 40 वर्ष दाखवत आहे. तर तू आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारशील का?” असा प्रश्न देताच अंकितानेही त्याला सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली की, “40 वर्षांची महिला म्हातारी असते का? मी तुला इतकी मोठी दिसते का?’
अंकिताचे सडेतोड उत्तर
पुढे अंकिता म्हणाली, ‘मी आधी पवित्र रिश्मामध्ये लहान वयातही मी आईची भूमिका साकारली आहे.” तसेच यावर विकी जैन अंकिताची बाजू घेत म्हणाला की, “तिनं तिच्या वयाच्या 18 व्या वर्षी आईची भूमिका साकारली होती.” पण एल्विशनं पुन्हा त्याचा तोच प्रश्न पुढे करत तिला विचारलं ” तू आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारशील का?” मग अंकितानेही अगदी ठणकावून सांगितलं की “नाही मी आलिया भट्टची आई दिसत नाही. मुळीच नाही.’
नेटकऱ्यांकडून एल्विशला प्रचंड ट्रोल केलं जात आहे
अंकितावर केलेल्या या कमेंटनंतर एल्विशचा हा व्हिडीओ रेडिट या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनाही त्याने विचारलेला हा प्रश्न अजिबात आवडला नाही. त्याला सोशल मीडियावर यासाठी चांगलंच ट्रोल केल जात आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की ‘या अशिक्षितला कोणी तरी सांगा की आलिया भट्ट ही 32 वर्षांची आहे. आलिया आणि अंकिता या दोघी त्यांच्या वयात फीट आणि सुंदर दिसतात.’ तर, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘एल्विश तू लूजरची भूमिका साकारशील का? तू खूप मोठा लूजर आहे.’ तर अजून एका युजरने कमेंट करत प्रश्न विचारला आहे की, ‘लोकं त्याच्या शोमध्ये का जातात? हाच प्रश्न एका पुरुषाला विचारला जाईल का?’ अशा पद्धतीने त्याला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.
आजही अंकिताची जादू कायम
दरम्यान, अंकिता लोखंडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज मधून सुरुवात केली होती. त्यानंतर ती पवित्र रिश्ता या मालिकेत दिसली. या शोमध्ये तिनं 2009 ते 2014 पर्यंत काम केलं. या शोमध्ये अंकिताला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं झलक दिखला जा, कॉमेडी सर्कस सारख्या वेगळ्या शोमधून तिचं अभिनय कौशल्य दाखवलं. सध्या अंकिता ही ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये दिसत आहे. इथे ती तिचा नवरा विकी जैनसोबत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List