शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुरू!
शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक येतात. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले. मात्र, ‘नाईट लॅण्डिंग’ची सुविधा नव्हती. अखेर रविवारी साईभक्तांची प्रतीक्षा संपली. हैदराबादहून 56 प्रवाशांना घेऊन इंडिगोचे विमान रात्री 9.50च्या सुमारास शिर्डी विमानतळावर लॅण्ड झाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लॅण्डिंगची गुढी उभारून विमानतळाने प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. दरम्यान, 2026 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यावेळी कोटय़वधी भाविकांची गर्दी होईल. त्यासाठी शिर्डी विमानतळावरून सुरू झालेल्या नाईट लॅण्डिंग सेवेमुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे.
चाचणीनंतर दोन वर्षांनी नाईट लॅण्डिंग सुरू
सध्या या विमातळावरून दिवसा 8 विमाने येतात तर 8 विमाने जातात अशा 16 फेऱया या विमानतळावरून सुरू आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेले सर्व कामे पूर्ण करत केंद्राकडे परवानगी मागीतली होती. केंद्राच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने फेब्रुवारी 2023 मध्ये नाईट लँडिंगला परवानगी दिली. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये इंडीगो एअरलाइन्सच्या रात्रीच्या पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी झाल़ी त्यानंतर दोन वर्षांनी ही सेवा सुरू झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List