हिरवे-लाल की काळे? तुम्ही कोणत्या रंगाचे द्राक्ष खातात? आरोग्यासाठी कोणते सर्वाधिक फायदेशीर?
जसा उन्हाळा सुरू झाला की बरेच जण द्राक्षं खातात. द्राक्षं हे सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. द्राक्षं दिसायला जरी लहान असले तरी त्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. तुम्ही लाल, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे द्राक्षं पाहिले असतील आणि तुम्ही सर्व खाल्लीही असतील. प्रत्येक जातीच्या आणि रंगाच्या द्राक्षांमध्ये वेगवेगळे पोषक घटक आढळतात. आजकाल बाजारातही द्राक्षे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पण या तीन रंगाच्या द्राक्षांपैकी कोणते द्राक्ष आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरू शकते. हे जाणून घेऊया…
लाल द्राक्षांचे फायदे काय?
- तुम्हाला वजन कमी करण्याचे असेल तर तुमच्यासाठी लाल द्राक्षे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. लाल रंगाच्या द्राक्षांमध्ये फायबर असल्याने लवकर भूक लागत नाही.
- लाल द्राक्षं आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करण्यासह शरीरासाठी अनावश्यक असलेल्या कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करते.
- लाल द्राक्ष खाल्याने रक्तवाहिन्यांची प्रक्रिया उत्तमरित्या चालते.
- लाल द्राक्षांमध्ये कार्बोहायड्रेट्स असले तरी, ते रक्तातील साखर वाढवण्याऐवजी कमी करण्यास मदत करतात.
- लाल द्राक्षे खाल्याने व्हिटॅमिन सी शरिरास मिळते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासही फायदेशीर ठरते.
- लाल द्राक्षांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी वरदान असून हे फक्त सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करत नाहीत तर तुम्हाला कायम तरूण ठेवण्यात मदत करते
- लाल द्राक्षांमध्ये असलेले काही घटक हे डोळ्याची दृष्टी सुधारण्यास आणि मोतीबिंदूसारख्या समस्या टाळण्यास मदत करतात.
हिरव्या रंगाचे द्राक्ष खाल्यास काय होते?
- हिरव्या रंगाच्या द्राक्षांमध्ये सर्वाधिक फायबर असते, जे पचनसंस्था सुधारण्यासह मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
- हिरव्या रंगाचे द्राक्ष कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते. यासह रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते.
- हिरव्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने जे त्वचेला चिरतरूण आणि तेजस्वी ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
- हिरव्या द्राक्षांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे मधुमेह झालेल्यांसाठी हे द्राक्ष थोडे उत्तम पर्याय आहे
- हिरव्या द्राक्षांमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
काळ्या रंगाचे द्राक्ष किती फायदेशीर?
- काळ्या रंगाच्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा तरुण राहते.
- काळे द्राक्ष स्मरणशक्ती वाढवण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.
- काळ्या द्राक्षांमध्ये असलेले पॉलीफेनॉल शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.
- काळ्या रंगाच्या द्राक्षांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हाडे बळकट आणि मजबूत होण्यास मदत होते.
कोणती द्राक्षे जास्त फायदेशीर?
आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काळी द्राक्षे सर्वात फायदेशीर मानली जातात. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स आणि हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर घटक असतात. तर हिरव्या आणि लाल रंगाच्या द्राक्षांचेही ठराविक असे काही फायदे आहेत आणि ते आहारात समाविष्ट केले पाहिजे जे आपल्या शरिरासाठी फायदेशीर ठरू शकतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List