नाकाच्या शस्त्रक्रियेतील चुकीमुळे प्रियांका चोप्रा ‘या’ गंभीर आजाराशी लढतेय; स्वत:च केला खुलासा

नाकाच्या शस्त्रक्रियेतील चुकीमुळे प्रियांका चोप्रा ‘या’ गंभीर आजाराशी लढतेय; स्वत:च केला खुलासा

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळे तसेच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे, तिच्या ठाम भूमिकांसाठी ओळखली जाते. प्रियांका कायम वेगवेगळ्या विषयांवर तिचं मत मांडताना दिसते. तसेच ती महिलांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करते. तिने एका मुलाखतीत स्वत:च्या आजाराबद्दल एक खुला केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

नाकाच्या शस्त्रक्रियेमुळे उद्धभवली समस्या 

प्रियांका ज्या आजारामुळे त्रस्त आहे तो त्रास तिला तिच्या नाकाच्या शस्त्रक्रियेमुळे उद्धभवल्याचं तिने सांगितलं. नाकाच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला दमा आणि नैराश्याची समस्या जाणवतेय. शिवाय प्रियांका म्हणाली, करोनानंतर दम्याच्या आजाराची खूप जास्त भीती वाटतं होती. तसेच नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम झाला. प्रियांकाला यातून बाहेर पडण्यासाठी जास्त काळ लागला होता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास वाढू लागतो असही तिने म्हटलं आहे. तापमान जास्त उष्ण असल्यामुळे श्वास घेताना दम्याची लक्षणे दिसून येतात. उष्णता वाढल्यामुळे श्वास घेणे सुद्धा कठीण होत असल्याचं तिने सांगितलं.

तिला आजाराची खूप जास्त भीती वाटत होती 

प्रियांका चोप्रा या आजाराबद्दल सांगताना म्हणाली की, करोनानंतर तिला दम्याची खूप जास्त भीती वाटतं होती. त्यानंतर तिच्या नाकाची शस्त्रक्रिया झाली. मात्र चुकीच्या शस्त्रक्रियेचा परिणाम आरोग्यावर झाला. नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. आजही ती या आजाराशी लढत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)


दमा किंवा अस्थमा होण्याची कारणे काय?

दमा हा एक जुना आजार आहे त्यात श्वसननलिकेत सुजन येते, श्वास घेताना त्रास होतो, छातीत दुखतं, सतत खोकला येतो. ही लक्षणे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवतात. हा आजार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच होवू शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. मात्र अनेक लोक दम्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. त्यामुळे दमा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

दम्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी उपाय

धुळीचे कण, बुरशी आणि प्राण्यांचे केस इत्यादी गोष्टींच्या सानिध्यात गेल्यामुळे दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. यामुळे ऍलर्जी निर्माण होते. हे सर्व घटक शरीरामध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.असे न केल्यास श्वास घेताना जळजळ आणि अरुंदता वाढू शकते. त्यामुळे बाहेर फिरतानाही मास्कचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

या घटकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा

दम्याच्या रुग्णांनी धूळ, माती, प्रदूषण, अ‍ॅलर्जीक घटकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. बाहेर जास्त मास्क लावूनच बाहेर जावे. घरात असल्यानंतर किंवा बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. अनेक काळ बंद असलेल्या ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिशय खराब असते, त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे. बंद ठिकाणी जाणे दम्याच्या रुग्णांसाठी जीवघेणे ठरू शकते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

MNS : अशा बॅनरला एकनाथ शिंदे तुमची मान्यता आहे का? त्या पोस्टरवरुन मनसैनिक खवळले MNS : अशा बॅनरला एकनाथ शिंदे तुमची मान्यता आहे का? त्या पोस्टरवरुन मनसैनिक खवळले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यात महाकुंभ, नदी प्रदूषण या विषयावर सविस्तरपणे बोलले होते. त्यानंतर...
बॉलिवूडमध्ये कोणीही सलमानच्या ‘सिकंदरला’ पाठिंबा का दिला नाही? सलमान म्हणाला “त्यांना वाटतं मला त्यांची गरज…”
गौरी खानवर का आली दादरमधील फ्लॅट विकण्याची वेळ, किंमत ऐकून बसेल धक्का
ही अभिनेत्री लग्नाशिवाय प्रेग्नेंट? बेबी बंपसोबत अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
“व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलताना अचानक दिग्दर्शक आला अन्..”; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग
पाकिस्तानी कलाकारांना विरोध मग शाहरुखचा ‘रईस’ कसा प्रदर्शित होऊ दिला? अमेय खोपकरांचं उत्तर
शेख हसीना यांच्या पाठोपाठ अवामी लीगचे एक लाख सदस्य हिंदुस्थानात, बांगलादेश सरकारच्या सल्लागारांचा दावा