बड्या थकबाकीदारांवर जप्ती, सीलची कारवाई; केवळ दोन आस्थापनांकडे 21 कोटींची थकबाकी

बड्या थकबाकीदारांवर जप्ती, सीलची कारवाई; केवळ दोन आस्थापनांकडे 21 कोटींची थकबाकी

मालमत्ता कर थकविणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात मुंबई महानगरपालिकेने जप्ती, लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमेत करनिर्धारण व संकलन खात्याने आज 2 मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही सुरू केली. या मोहिमेत दोन खासगी विकासकांच्या मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये भूखंड मालमत्ता करापोटी 1 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) प्रमाणे या दोन थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण 21 कोटी 63 लाख 56 हजार 867 रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदारांनी 21 दिवसांत करभरणा न केल्याने आता मालमत्ता जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार आणि सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे.

या थकबाकीदारांना दणका

माझगाव (ई विभाग) येथे सुमेर बिल्ट कार्पेरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा भूखंड आहे. भूखंडाच्या करापोटी कर निर्धारण व संकलन विभागाने 11 फेब्रुवारी 2025 रोजी मागणीपत्र जारी केले होते. मात्र मुदतीत करभरणा केला नाही. त्यामुळे जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये 18 कोटी 1 लाख 36 हजार 164 रुपयांचा करभरणा केला नाही तर भूखंड लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मुलुंड (टी विभाग) येथील गव्हाणपाडा गाव येथील आर.आर. डेव्हलपर्स यांच्याकडे 3 कोटी 62 लाख 20 हजार 703 रुपयांची थकबाकी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Nagpur News – नागपुरात होळीच्या सणाला गालबोट, लाकडं अंगावर कोसळून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू Nagpur News – नागपुरात होळीच्या सणाला गालबोट, लाकडं अंगावर कोसळून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
होळीसाठी लाकडं आणायला गेलेल्या 12 वर्षाच्या मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरमध्ये घडली आहे. लाकडाचे ओझे डोक्यावर उचलताना संतुलन बिघडले आणि...
सरकारमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस वाद, शिंदे सरकारने घेतलेले अनेक निर्णय फडणवीसांकडून बंद
जळगावमध्ये रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या कामगारांना अज्ञात वाहनाने चिरडले, तिघांचा मृत्यू
एकनाथ शिंदे यांच्याच योजना या सरकारने बंद केल्या; विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकारला टोला
आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केला आहे; जयंत पाटील यांचा जबरदस्त टोला
देवगड आगार उपेक्षितच! गाड्यांच्या कमतरतेमुळे अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद
Mumbai News – किरकोळ वादातून चेंबूरमध्ये तरुणाची हत्या, दोन आरोपींना अटक