वरुण धवन या अभिनेत्रीसह भक्तीत दंग; ऋषिकेशमध्ये गंगा आरती; फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री पूजा हेगडे त्यांच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. पण त्यापूर्वी ते भक्ती रंगात रंगलेले पाहायला मिळाले. त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण गंगा नगरी ऋषिकेशमध्ये सुरू झालं आहे. शुटींगपूर्नी वरुण आणि पूजा यांनी ऋषिकेशमध्ये गंगा मातेचे आशीर्वाद घेतले आणि तसेच गोघांनी मिळून गंगा आरतीही केली
वरुण आणि पूजा हेगडे भक्तीत दंग
वरुण आणि पूजा हेगडे यांनी सोशल मीडियावर याचे फोटो पोस्ट करून माहिती दिली. दोन्ही कलाकार एकत्र गंगा आरती करताना दिसले. दोघांनीही इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी, हा स्टार भक्तीत मग्न असल्याचे दिसून आले. फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ऋषिकेशमधील आमच्या शेड्यूलची सुरुवात छान झाली. धन्य.” असं म्हणत त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली.
गंगा आरती अन् पूजा
तसेच शुक्रवारी दोन्ही कलाकार परमार्थ निकेतन आश्रमात पोहोचले होते. तेव्हा यादरम्यान, दोघांनीही गंगा आरतीत भाग घेतला आणि गंगा मातेची आरती केली. यावेळी वरुण पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसला, तर पूजा सलवार सूटमध्ये होती. गंगा आरती करण्यासोबतच, वरुण धवन आणि पूजा हेगडे यांनी एक रोपही लावलं. दोघांनीही परमार्थ निकेतनच्या आवारात रुद्राक्षाचे रोप लावले आणि आध्यात्मिक, सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
फोटो आणि व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये हे दोघेही एकत्र रोपाला पाणी घालताना दिसत आहेत. गंगा आरतीव्यतिरिक्त, पूजा आणि वरुण यांनी आश्रमातील मुलांशी संवाद साधला. या दोघांनाही परमार्थ निकेतनचे योगाचार्य आणि स्वयंसेविका गंगा नंदिनी त्रिपाठी यांनी स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या आध्यात्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विषयांबद्दल माहिती दिली.
वरुण आणि पूजाचा हा चित्रपट वरुणचे वडील आणि लोकप्रिय दिग्दर्शक डेव्हिड धवन दिग्दर्शित करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेव्हिड धवन चित्रपटाच्या शूटिंगसाठी तीन दिवस ऋषिकेशमध्ये राहणार आहेत. मृणाल ठाकूर, मनीष पॉल, कुब्रा सैत आणि नितीश निर्मल हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List