Mahesh Babu Daughter: माझी मातृभाषा मराठी!; महेश बाबूच्या मुलीची मराठी ऐकलीत का?
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबू हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या सगळीकडे महेश बाबूच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. महेश बाबूला महाराष्ट्राचा जावई असे म्हटले जाते. कारण त्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केले आहे. आता महेश बाबू आणि नम्रताची मुलगी चर्चेत आहे. तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती मराठीमध्ये बोलताना दिसत आहे.
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरच्या मुलीचे नाव सितारा आहे. सिताराने इंडस्ट्रीमध्ये अद्याप पदार्पण केलेले नाही. पण तिची चर्चा मात्र सुरुच असते. काही दिवसांपूर्वी सिताराने एका मुलाखतीमध्ये मराठीमध्ये वाक्य म्हटलं होते. तिचा हा मराठीमध्ये बोलतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता सितारा काय म्हणाली चला जाणून घेऊया…
वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?
सिताराने नऊ महिन्यांपूर्वी न्यूज बझला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सितारा इंग्रजीमध्ये बोलताना दिसत आहे की, ‘मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि तेलुगू ही माझ्या घरात बोलली जाणारी भाषा.’ त्यावर मुलाखत घेणाऱ्या मुलीने ‘काही शब्द मराठीमध्ये बोल ना’ सिताराला विचारले. त्यावर सितारा मराठी भाषेत बोलते की, ‘तू कशी आहेस?’ ते ऐकून ‘मी छान आहे’ असे मुलाखत घेणारी मुलगी म्हणाली. सिताराने त्या मुलीला तुझी मराठी खूप चांगली आहे असे म्हटले. सोशल मीडियावर सिताराचा हा मराठीमध्ये बोलतानाचा व्हिडीओ पुन्हा तुफान व्हायरल झाला आहे.
सिताराने जरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले नसले तरी तिची प्रचंड लोकप्रियता आहे. ती अगदी कमी वयात न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर झळकली. पण ही जाहिरात करण्यासाठी तिने मोठं मानधन घेतलं आहे. तिने एका ज्वेलरीसाठी केलेले फोटोशूटचे फोटो या क्वेअरवर दाखवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महेश बाबूच्या लेकीने म्हणजेच सिताराने एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी तब्बल 1 कोटी रुपये घेतले आहेत.
महेश बाबूच्या आगामी सिनेमांविषयी
महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहे. लवकरच तो दिग्दर्शक एसएस राजमौली यांच्या SSMB 29 या चित्रपटात दिसणार आहे. हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. या चित्रपटात महेश बाबूसोबत बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List