हिरोशिमा, नागासाकी हल्ला आठवतोय ना, त्यापेक्षा जास्त वेदना देऊ! चीनकडून जपानला अणुबॉम्बची धमकी
चीन विरुद्धच्या तैवानला मदत करणाऱ्या जपानला चीनने इशारा दिला आहे. हिरोशिमा आणि नागासकीवरील अणुबॉम्ब हल्ल्याची आठवण करुन त्यापेक्षाही जास्त वेदना देऊ, अशी धमकी चीनने जपानला दिली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अमेरिकन टॅरिफबद्दल बोलताना जपानवरही निशाणा साधला.
चीन आणि तैवानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. तैवान जपानच्या ताकदीचा फायदा घेत बळकट होण्याचा प्रयत्न करत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. जपान जाणूनबुजून चीनमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत चीन गप्प बसणार नाही, असे वांग म्हणाले.
जपानने हिरोशिमा आणि नागासकीचा इतिहास विसरू नये. हिरोशिमावरील अणुबॉम्ब हल्ल्याला 80 वर्षे पूर्ण होत आहेत. आम्ही त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. जर जपान सुधारले नाही तर आम्ही त्यापेक्षाही अधिक वेदना देऊ, अशी धमकी वांग यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List