समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यापूर्वी मोठी टोलवाढ, सुसाट प्रवास महागणार, जाणून घ्या कोणत्या वाहनांना किती टोल?

समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यापूर्वी मोठी टोलवाढ, सुसाट प्रवास महागणार, जाणून घ्या कोणत्या वाहनांना किती टोल?

Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणारा समृद्धी महामार्ग अजून पूर्ण झाला नाही. या महामार्गाचा शेवटचा टप्पा अजून राहिला आहे. परंतु महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना झटका बसणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी ) येत्या 1 एप्रिलपासून महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ तब्बल 19 टक्के करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी ही वाढ केल्यामुळे आता पुढील महिन्यांपासून वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आता येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुरु होणार आहे. मात्र संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एमएसआरडीसीने टोलमध्ये मोठी वाढ केली आहे. नवी टोलवाढ येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.

तीन वर्षांसाठी असणार नवीन दर

  • समृद्धी महामार्गात आता केलेली 19 टक्के दरवाढ ही तीन वर्ष स्थिर राहणार आहे. त्यानंतर पुन्हा आढावा घेऊन दरवाढ केली आहे. आता पुढील तीन वर्षासाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे दर लागू राहतील, असे एमएसआरडीसीने कळवले आहे.
  • नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार, हलकी मोटर यांना सध्या 1080 रुपयांचा टोल लागायचा मात्र नव्या दरानुसार 1,290 रुपये लागतील
  • हलकी व्यावसायिक, मिनीबस सध्या 1745 टोल होतो. तो नवीन वरवाढीनुसार 2075 रुपये करण्यात आला.
  • बस किंवा दोन आसाचा ट्रकासाठी आतापर्यंत 3655 रुपये लागत होते. आता नवीन दर 4355 रुपये असणार आहे.
  • अति अवजड वाहनांना जुने दर 6980 होते. नवे दर 8315 रुपये असणार आहे.

असा सुरु झाला मार्ग

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी एक्सप्रेस असे नाव दिले. या मार्गाचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 ला सुरु झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी असा 520 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भरवीर असा 105 किमीचा मार्गाचे उद्घघाटन केले होते. 23 मे 2023 पासून हा दुसरा टप्पा सुरु झाला होता. त्यानंतर तिसरा टप्पा 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यान सुरु झाला. आता शेवटचा 76 किमीचा टप्पा महिन्याभरात सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मराठीबाबत कोणी उलटसुलट केलं तर… राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले ? मराठीबाबत कोणी उलटसुलट केलं तर… राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले ?
महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे, बँकामध्येदेखील मराठी बोललं जातं की नाही याची तपासणी करा असं म्हणत मराठीच्या आग्रही भूमिकेचा मनसे अध्यक्ष...
‘मी ड्रग्स ॲडिक्ट, सेक्स ॲडिक्ट पण कधीच…’, प्रसिद्ध कॉमेडियनने बलात्काराच्या आरोपांवर सोडलं मौन
चुकीची कामे केल्यास पाठिशी घालणार नाही, चद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
आजारी लेकीच्या इंजेक्शनसाठी जमीन विकून गाठले चीन, हातकणंगलेतील हतबल बाबाची कहाणी
एकही सुट्टी न घेतलेल्या शिक्षिकांच्या पाठीवर थाप, चांदीची नेम प्लेट देऊन गौरव
सोप्पंय! घिबली फोटो असा बनवा, फ्रीमध्ये फोटो बनवण्याची सोपी ट्रिक
तैयब मेहता यांच्या पेंटिंगची 61.8 कोटींना विक्री