भाजप खासदार तेजस्वी सूर्या अडकले लग्नबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय गायिका, जाणून घ्या तिच्याविषयी
गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता तेजस्वी सूर्या यांच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी चेन्नईची प्रसिद्ध गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी लग्न केले आहे. बेंगळुरूमध्येच हा विवाह सोहळा पार पडला. पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आला होता.
कोण आहे तेजस्वी यांची पत्नी?
खासदार तेजस्वी सूर्या यांची पत्नी शिवश्रीने शास्त्र विद्यापीठातून बायोइंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली आहे. यासोबतच तिने चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमएची पदवी मिळवली आहे. शिवश्रीचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. तिथे तिचे २ लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी सूर्या यांची पत्नी शिवश्री स्कंदप्रसादचे अनेकदा कौतुक केले आहे.
बेंगलुरु दक्षिण से सांसद श्री @Tejasvi_Surya जी एवं संगीत गायिका, भरतनाट्यम की प्रसिद्ध कलाकार शिवश्री स्कंदप्रसाद जी के शुभ विवाह समारोह में सम्मिलित होकर नवदंपत्ति को उनके मंगलमय दांपत्य जीवन के लिए शुभकामनाएँ व आशीर्वाद प्रदान किया। pic.twitter.com/S7n531yxmn
— Arjun Ram Meghwal (@arjunrammeghwal) March 6, 2025
तेजस्वी सूर्या आणि शिवश्री यांचा विवाह 6 मार्च रोजी बेंगळुरूमध्ये संपन्न झाला. लग्नानंतर ९ मार्च रोजी गायत्री विहार येथील पॅलेस ग्राउंड, बेंगळुरू येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या रिसेप्शनची जोरदार तयारी सुरु आहे. तेजस्वी सूर्या आणि शिवश्री यांना आशिर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत तेजस्वी सूर्या
तेजस्वी सूर्या यांना भाजपमधील ‘फायर ब्रँड’ नेता असे म्हटले जाते. तेजस्वी सूर्या त्यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वासाठी विशेष ओळखले जातात. त्यांचा राजकीय प्रवास ABVPमधून सुरू झाला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, बंगळुरू दक्षिणमधून प्रचंड मतांनी जिंकून ते सर्वात तरुण खासदारांपैकी एक बनले. 2020 मध्ये भाजपने त्यांना युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले. तेजस्वी यांच्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. अनेकजण त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List