हिरवी मिर्ची खाल्ल्यास पिकल्या पानाचा देठ होणार ‘हिरवा’, फायदे जाणून पुरूष आजपासूनच सुरू करतील खाणे
मिर्ची शिवाय जेवणाला रंगत येत नाही. त्यात भारतीय लोक तर मसालेदार, तिखट, झणझणीत जेवणाशिवाय राहूच शकत नाहीत. हिरव्या आणि लाल मिरच्या जेवणाला स्वाद आणतात. तो तिखटपणा, झणझणीतपणा, तर्री अवघं कसं लाजबाबच, हो की नाही. हिरवी मिर्ची ही तिच्या पोषक तत्त्वांमुळे पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानण्यात येते. रोज एक हिरवी मिर्ची (Green Chili) खाल्यास पुरूषांना त्याचे फायदे दिसून येतील.
हिरव्या मिर्चीत अनेकदा खाताना थंडावा जाणवतो. तिखटासोबतच, झणझणीत चव असतानाही थंडावा जाणवतो. कॅप्सेसिन नावाच्या एका घटकामुळे हा थंडावा जाणवतो. हिरव्या मिर्चीत अनेक पोषक घटक असतात. त्यात प्रोटीन, फॅट, फायबर, व्हिटॅमिन सी आणि ए, पोटॅशियम, आर्यन असे घटक असतात. हे घटक शरीराला पोषण देतात.
पुरूषांसाठी तर हिरवं सपान
पुरूषांच्या तारुण्यांसाठी, सळसळत्या उत्साहासाठी हिरवी मिर्ची म्हणजे जणू हिरवं सपानचं असते. पुरुषांमध्ये गॅस, अपचनाची समस्या दिसून येते. रोज पाचक औषधाची सवय लावण्यापेक्षा तज्ज्ञाच्या मदतीने हिरवी मिर्ची खाता येईल. पचन संस्था सुधारण्यासाठी हिरवी मिर्ची हे खास औषध आहे.
वजन कमी करण्यासाठी
हिरव्या मिर्चीत कमी कॅलरी असतात. ते मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे वजन वाढत नाही. ते नियंत्रित राहते. अशात जर एखादी व्यक्ती त्याच्या पोटाच्या घेरामुळे त्रासलेली असेल तर त्याच्या डाएट प्लॅनमध्ये एक हिरवी मिर्ची तो सेवन नक्की करू शकतो.
प्रतिकार शक्ती वाढते
प्रत्येक हिरव्या मिर्चीत व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते. ते शरीराची प्रतिकार शक्ती वाढवते. अनेक आजारांपासून तुमची सुटका होते. ज्यांची प्रतिकार शक्ती कमजोर आहे. जे सतत आजारी पडतात. त्यांच्यासाठी हिरवी मिर्ची सर्वात चांगले टॉनिक म्हणावे लागेल.
लैंगिक आरोग्यासाठी उत्तम
ज्या पुरुषांना थकवा येतो. लगेच थकायला होते. त्यांचे लैंगिक आरोग्यात अडचण असते. त्यांनी हिरव्या मिर्चीचा वापर करून पाहावा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे लैंगिक समस्या दूर होण्यास मदत होते. शरीरातील चरबी कमी होण्यासही मदत होते.
डिस्क्लेमर : वरील माहिती विविध स्रोतांवर आधारित असून ती केवळ आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी आहे. कोणतेही आरोग्यसेवा किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List