बेली फॅट कमी करण्यासाठी ‘हे’ 4 डिटॉक्स वॉटर वापरून तर पहा, आठवड्यात दिसून येईल परिणाम

बदलती जीवनशैली, बाहेरील पदार्थांचे अधिक सेवन करणे, यामुळे अनेकांचे वजन वेगाने वाढत चालेले आहे. जर तुम्हीही वाढणाऱ्या वजनाने खूप चिंतेत असाल आणि अनावश्यक ताणतणावात असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही जर तुमच्या डाएट मध्ये अजून डिटॉक्स वॉटरचा समावेश केला नसेल तर एकदा डिटॉक्स वॉटर पिऊन पहा. आजकाल वाढते वजन ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी केवळ शरीराच्या फिटनेसवरच नाही तर आरोग्यावरही परिणाम करते. यामुळे वजन वाढल्याने अनेक आजारांचा धोका देखील वाढतो, म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर चयापचय वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. यातील खास गोष्ट म्हणजे हे डिटॉक्स वॉटर तुम्ही घरी सहज बनवू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला चार प्रभावी डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे याबद्दल सांगणार आहोत जे वजन कमी करण्यास मदत करू शकतात. चला जाणून घेऊयात…
संत्र आणि दालचिनी डिटॉक्स वॉटर
वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी डिटॉक्स वॉटर तयार करू शकतात. त्यापैकी एक म्हणजे संत्रा आणि दालचिनी डिटॉक्स वॉटर. संत्री आणि दालचिनी दोन्ही वजन कमी करण्यास मदत करतात. संत्र्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक शरीराला हायड्रेट ठेवतात. यामध्ये असलेली दालचिनी ही रक्तातील साखर नियंत्रित करते आणि बेली फॅट कमी करते. यासाठी तुम्ही जर याचे पाणी तयार करून दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट केले तर बेली फॅट हळूहळू कमी होऊ लागते.
संत्र आणि दालचिनीचे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी पाण्यात काही संत्र्याचे तुकडे घेऊन त्यात काही दालचिनीचे तुकडे मिक्स करा आणि २ तास फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर हे पाणी बाहेर काढून थोडे थंड झाल्यावर प्या. या डिटॉक्स वॉटरचे सेवन दररोज करा. काही आठवडयांमध्येच तुमचे वजन कमी होईल.
लेमन डिटॉक्स वॉटर
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की लोकं वजन कमी करण्यासाठी सकाळी लिंबू पाणी पितात . लिंबू केवळ वजन कमी करण्यासाठीच फायदेशीर नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. लिंबू डिटॉक्स वॉटर बनवताना, जर तुम्ही त्यात थोडासा पुदिना घातला तर तुम्हाला त्याचे दुहेरी फायदे मिळतील. तसेच पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
लेमन डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी पाण्यात लिंबाच्या फोडी मिक्स करा आणि २ तास फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर हे पाणी बाहेर काढून थोडे थंड झाल्यावर प्या. यामुळे वजन वेगाने कमी होते.
बार्लीचे डिटॉक्स वॉटर
बार्लीचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. बार्ली हे एक धान्य आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात त्याचबरोबर फायबरसह इतर अनेक घटक आढळतात. हे पचनसंस्था मजबूत करतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्यांचा धोका देखील कमी होतो. बार्लीचे डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याने बेली फॅट वितळवण्यासही ते उपयुक्त ठरते. एवढेच नाही तर बार्लीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने चयापचय वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
बार्लीचे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी थोडे बार्ली घ्या. एका मोठ्या भांडयात अंदाजे पाणी घेऊन 7-8 मिनिटे पाणी उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर ते एका कपात गाळून त्यात लिबांचा रस टाकुन थंड करा. आता हे बार्लीचे डिटॉक्स वॉटर हळूहळू चहासारखे प्या.
काकडी-पुदिन्याचे डिटॉक्स वॉटर
कडक उन्हाळा येत आहे, त्यामुळे बाजारात तुम्हाला भरपूर काकडी मिळतील. पुदिना देखील सहज उपलब्ध होईल. तर या दिवसात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी-पुदिन्याचे डिटॉक्स वॉटर तयार करून नियमित यांचे सेवन करा. हे बनवण्यासाठी, काकडी-पुदिना स्वच्छ धुवा आणि चांगले चिरून घ्या. चिरलेले काकडी आणि पुदिना पाण्यात मिसळा. तयार झालेले हे पाणी सुमारे दोन तासांनी प्या. यामुळे चयापचय वाढतो आणि वजन कमी होण्यास सुरुवात होते. हे डिटॉक्स वॉटर शरीराला ताजेतवाने देखील ठेवते, यामुळे पचनक्रियाही चांगली राहते .
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List