Pimpri Chinchwad News – आत्महत्या केलेल्या पत्नीच्या नावे खोटी चिठ्ठी; संगणक अभियंता पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad News – आत्महत्या केलेल्या पत्नीच्या नावे खोटी चिठ्ठी; संगणक अभियंता पतीविरुद्ध गुन्हा दाखल

आजाराने एक वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर त्यास पत्नीला जबाबदार धरून संगणक अभियंता असणाऱ्या पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजू नये, यासाठी पतीने पत्नीच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी पिंपळे सौदागर येथे घडली.

हिमांशू दिनेश जैन (वय – 35, रा. पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या 32 वर्षीय विवाहितेच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हिमांशू हा संगणक अभियंता आहे, तर आत्महत्या केलेली विवाहिता ही गृहिणी होती.

फिर्यादी यांचा जावई आरोपी हिमांशू याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यावरून पती-पत्नीत वाद होत असत. त्यांच्या एक वर्षीय मुलीचे 27 फेब्रुवारी 2024 रोजी आजारामुळे निधन झाले. मुलीच्या मृत्यूला पत्नीला जबाबदार धरून आरोपी हिमांशूने पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सतत वाद घालून तिचा छळ केला.

पतीकडून वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, याकरिता आरोपी हिमांशू याने पत्नीने चिठ्ठी लिहिली आहे, असे भासवून एक खोटी चिठ्ठी लिहून ठेवली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार कणसे तपास करीत आहेत.

“चिठ्ठीतील हस्ताक्षर हे पत्नीचेच आहे की अन्य कोणाचे आहे, याची पडताळणी करण्यासाठी चिठ्ठी हस्ताक्षरतज्ज्ञाकडे पाठविण्यात येणार आहे.”

महेश बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘झोमॅटो’ची ‘वुमन्स डे’ निमित्त मोठी भेट, पहिल्या महिला रायडिंग सेंटरचे उद्धाटन ‘झोमॅटो’ची ‘वुमन्स डे’ निमित्त मोठी भेट, पहिल्या महिला रायडिंग सेंटरचे उद्धाटन
अनेकदा घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये मोबाईल किंवा अॅपवरुन खाद्यपदार्थ मागविण्यासाठी झोमॅटो हे लोकप्रिय ठरले. झोमॅटोद्वारे तुम्हाला तुमचे जेवण अगदी सहज घरपोच...
‘सौ सुनार की एक लोहार की’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीमुळे आता भाजप अडचणीत
अखेर समोर आलं तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण; जाणून धक्का बसेल
भाजप खासदार तेजस्वी सूर्या अडकले लग्नबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय गायिका, जाणून घ्या तिच्याविषयी
राम गोपाल वर्मांची सुटका नाही? न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट
जर तुमचंही शरीर देत असेल ‘हे’ पाच संकेत; तर समजू जा किडनी खराब झालीये
हा ‘साबण’ नेमका आला कुठून ? ४ मोठे फायदे व तोटे एकदा नक्की वाचा