मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठीच; भैयाजी जोशी यांनी माफी मागावी, आदित्य ठाकरे कडाडले

मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठीच; भैयाजी जोशी यांनी माफी मागावी, आदित्य ठाकरे कडाडले

मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. सुरेश भैयाजी जोशी यांनी हे जाणून घ्यावं आणि आपल्या विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. ते विधानभवन येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

मुंबईत विविध राज्य आणि प्रांतातील लोक राहतात. विविध भाषा बोलतात. मुंबईत अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी उधळली होती. या विधानाचा आदित्य ठाकरे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला.

भैयाजी जोशी म्हणतात घाटकोपरची भाषा गुजराती आहे. आता तुम्हाळा कळले असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी का आणि कुणासाठी करत आहेत. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशप्रमाणे आज आपल्याला ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे की मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, असे आदित्य ठाकरे ठणकावून म्हणाले.

मुंबईमध्ये देशभरातून लाखो लोक स्वप्न घेऊन येतात. काम घेऊन येतात आणि मोठे होतात. यावर आमचा आक्षेप नाही. पण या मुंबई आणि मराराष्ट्राची भाषा मराठी आहे हे सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावे. त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला पाहिजे. अन्यथा जशी अबू आझमी, कोरकटर, सोलापूरकरवर कारवाईची मागणी करत आहोत, तशी कारवाई भैयाजी जोशींवर झाली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरोखरच या मातीतील असतील तर त्यांनी यावर उत्तर द्यावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.

किती सोसायचं हा विचार करण्याची वेळ आलीय

सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केले आहे, ते प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे. कारण गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा, महापुरुषांचा अपमान, मराठी भाषेचा अपमान करत आला आहे. मुख्यमंत्री निवडणुकीच्या आधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असे सांगत होते. खरी परिस्थिती ही आहे की महाविकास आघाडी सरकार मरीन ड्राईव्ह येथे मराठी भाषा भवन उभारणार होते. त्याला महायुती सरकारने स्थगिती दिली. गिरगाव चौपाटी येथे मराठी नाट्यकलेचे दालन करणार होतो, त्याला स्थगितीच नाही तर ते रद्द करून टाकले. आज आपल्या महापुरुषांचा अपमान सुरू असून हे किती सोसायचं हा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘झोमॅटो’ची ‘वुमन्स डे’ निमित्त मोठी भेट, पहिल्या महिला रायडिंग सेंटरचे उद्धाटन ‘झोमॅटो’ची ‘वुमन्स डे’ निमित्त मोठी भेट, पहिल्या महिला रायडिंग सेंटरचे उद्धाटन
अनेकदा घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये मोबाईल किंवा अॅपवरुन खाद्यपदार्थ मागविण्यासाठी झोमॅटो हे लोकप्रिय ठरले. झोमॅटोद्वारे तुम्हाला तुमचे जेवण अगदी सहज घरपोच...
‘सौ सुनार की एक लोहार की’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीमुळे आता भाजप अडचणीत
अखेर समोर आलं तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण; जाणून धक्का बसेल
भाजप खासदार तेजस्वी सूर्या अडकले लग्नबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय गायिका, जाणून घ्या तिच्याविषयी
राम गोपाल वर्मांची सुटका नाही? न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट
जर तुमचंही शरीर देत असेल ‘हे’ पाच संकेत; तर समजू जा किडनी खराब झालीये
हा ‘साबण’ नेमका आला कुठून ? ४ मोठे फायदे व तोटे एकदा नक्की वाचा