२१ वर्षांनंतर सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर, दिसणार ‘या’ नाटकात

२१ वर्षांनंतर सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर, दिसणार ‘या’ नाटकात

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो. प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. आता ते कोणत्या नाटकात दिसणार चला जाणून घेऊया…

‘गेट वेल SOON!’, ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’, ‘संज्या छाया’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘चारचौघी’, ‘आज्जी बाई जोरात’ आदी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचे शिवधनुष्य उचलले आहे. आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक ‘भूमिका’ येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते… असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. अभिनेते सचिन खेडेकर यांनी आजवर दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका, नाटक या तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवला असून, सोबत हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.

वाचा: वयाच्या १४व्या वर्षी ५५ वर्षीय मोलकरणीशी शारीरिक संबंध होते; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक दावा

आता आगामी ‘भूमिका’ या नाटकात ते कोणत्या रूपात रसिकांच्या भेटीला येतात याची उत्सुकता आहे. या नाटकातील सचिन खेडेकर यांच्या व्यक्तिरेखेबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. त्याचप्रमाणे नाटकातील इतर कलाकार आणि तंत्रज्ञ कोण असणार ? याची माहितीसुद्धा लवकरच उलगडली जाणार आहे. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘महाराष्ट्र एकीकरण’चे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव, सीमाभागातील मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप ‘महाराष्ट्र एकीकरण’चे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव, सीमाभागातील मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप
भाषिक तेढ निर्माण करणे आणि गट तयार करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण...
साईभक्तांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण
कोरटकरला न्यायालयीन कोठडी
नवीन वर्षात गुढी उभारायची आहे, कामाला लागा! उद्धव ठाकरे यांचे रणशिंग
अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होतेय, सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही घटनाविरोधी; निवृत्त न्यायमूर्तीगौतम पटेल कडाडले
लोकशाही मार्ग कुणालाच सोडता येणार नाही, संविधानावर आघात केला तेव्हा इंदिरा गांधींनाही जनतेने पराभूत केले – शरद पवार
बाजारात उत्साहाची दडी, महागाई गगनाला भिडली, मुंबईकरांनी फक्त परंपरा जपली; मुहूर्ताला सोने खरेदीत 50 टक्क्यांची घट