Famous Bollywood Songs On Holi- बॉलीवुडची सर्वोत्कृष्ट होळीवरील गाणी, आजही ठेका धरायला लावणारी अजरामर होळीगीते!

Famous Bollywood Songs On Holi- बॉलीवुडची सर्वोत्कृष्ट होळीवरील गाणी, आजही ठेका धरायला लावणारी अजरामर होळीगीते!

बाॅलीवुडने आपल्याला काय दिलं? या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागल्यावर अनेक गोष्टी नजरेसमोर येतील. त्यातील एक म्हणजे बाॅलीवुडने आपल्याला सदैव स्मरणात राहणारी एक गोष्ट दिली ती म्हणजे सदाबहार गीते.. बाॅलीवुडच्या प्रेमात असणारा एक चाहता वर्ग आहे जो कलाकार किंवा चित्रपटांच्यापेक्षाही गाण्यांच्या प्रेमात आहे. बाॅलीवुडने आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यातील सणांना साजरा करण्याचा एक नवा आयाम दिला. म्हणूनच आपण केवळ चित्रपट पाहात नाही तर, अनेकदा तो चित्रपट जगत असतो. यातला एक भाग म्हणजे बाॅलीवुडची गाणी, आजही होळीला ”मलदे गुलाल मोहे, आयी होली आयी हैं”.. हे गाणं तुम्हाला आठवतंय की नाही.. हिच तर अजरामर गाण्यांची खरी गंमत आहे.

 

आपले बॉलीवुड नेहमीच होळी या उत्सवाच्या प्रेमात होते. अगदी 40 च्या दशकापासून, चित्रपट निर्मात्यांनी कथेला थोडेसे प्रभावित करून त्यामध्ये होळीचे गाणे टाकलेले आहे. जेव्हापासून चित्रपटाचा व्यवसाय सुरू झाला, तेव्हापासून भारतीय सण कथेतील एक अविभाज्य घटक आहेत. क्लासिक चित्रपटांमध्ये भारतातील लोकप्रिय आणि उत्सवांपैकी एखादे गाणे चित्रपटात असणे अनिवार्य होते. म्हणूनच आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय गाणी म्हणजे खासकरुन होळीची गाणी आजही सिनेमाप्रेमींच्या मनात घर करून आहेत. प्रत्येक होळी पार्टीत वर्षानुवर्षे ही गाणी आजही वाजतात आणि यापुढेही या गाण्यांचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही.

बाॅलीवुडची सदाबहार होळीवरील गाणी

जारे हट नटखट ( नवरंग)

आज ना छोडंगे (कटी पतंग)

होली के दिन दिल मिल जाते हैं (शोले)

फागुन आययो रे  (फागुन)

होली आयी रे मस्तानो की टोली (जखमी)

मल दे गुलाल मोहे आयी होली आयी रे (कामचोर)

जोगीजी धीरे धीरे (नदिया के पार)

होळी आयी होली आयी रे (मशाल)

रंग बरसे भीगे चुनारवाली  (सिलसिला)

होली खेले रघुवीर अवध में (बागबान)

बलम पिचकारी तुने मुझे मारी  (ये जवानी है दिवानी)

होलिया में उडे रे गुलाल- इला अरुण

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हार्दिक पंड्यायला पुन्हा दंड हार्दिक पंड्यायला पुन्हा दंड
बंदीच्या शिक्षेमुळे पहिल्या सामन्यास मुकलेल्या हार्दिक पंड्याने यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी पाऊल ठेवले अन् पहिल्याच सामन्यात त्याला कारवाईला...
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यातील कामगार संघटना आक्रमक, 20 मे रोजी महाराष्ट्र बंदचा इशारा
ज्ञानसाधक वामनरावांच्या स्मृतींना उजाळा, जन्मशताब्दीनिमित्त जन्मगावी कुटुंबीयांनी जागवल्या आठवणी
ताडदेवकरांनी अनुभवला स्वागत यात्रेचा जल्लोष
IPL Points Table – सारेकाही निसटून चाललेय…
हरियाणाचे दुहेरी जेतेपद हुकले, किशोर गटात जिंकले, पण किशोरींच्या गटात उपविजेते
शिवमुद्रा, अष्टविनायक विजेते