विक्कीचा ‘छावा’ बॉलीवूडच्या टॉप 5 चित्रपटांत
विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने चांगलेच बॉलीवूड गाजवले आहे. हा चित्रपट बॉलीवूडच्या टॉप 5 चित्रपटांत गेला आहे. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाला उद्या बरोबर एक महिना होईल. या चित्रपटाने महिनाभरात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांत शाहरूख खानचा ‘जवान’ आहे. या चित्रपटाने 640.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दुसऱ्या नंबरवर ‘स्त्री-2’ आहे. या फिल्मने 597.99 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या स्थानावर ‘ऑनिमल’ असून या चित्रपटाने 553.87 कोटी, तर चौथ्या नंबरवर ‘पठाण’ आहे. या चित्रपटाने 543.09 कोटी रुपये कमावले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले आहे. उद्या, गुरुकार आणि शुक्रवार त्यानंतर विकेंड शनिवार आणि रविवार असे सलग चार दिवस सुट्टीचे असल्याने छावाला याचा नक्कीच फायदा मिळू शकतो. या चार दिवसात छावाच्या कमाईत आणखी भर पडणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List