कोणाचाही फोन येताच रणवीर सिंग काय करायला लागतो? दीपिकची इंस्टा पोस्ट चर्चेत

कोणाचाही फोन येताच रणवीर सिंग काय करायला लागतो? दीपिकची इंस्टा पोस्ट चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे 8 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. दीपिका अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सध्या तिने शेअर केलेला एका फोटोची बरीच चर्चा होताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने सांगितले आहे की तिचा पती आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग फोन येताच नेमकं काय करायला लागतो ते.

दीपिकाने रणवीरची खिल्ली उडवली

सध्या दीपिका पॅरिसमध्ये आहे. ती लुई व्हिटॉन फॉल/विंटर शो 2025 मध्ये सहभागी होऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. दीपिकाने तिथून बरेच फोटोही तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण सध्या तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने तिच्या पतीच्या म्हणजे रणवीरच्या एका सवयीबद्दल सांगितलं आहे. म्हणजे दीपिकाने रणवीरची खिल्ली उडवली आहे.

“जेव्हा माझा नवरा कॉलवर कोणाशी तरी बोलतो”

दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये बर्फाने झाकलेला रस्ता दिसतोय आणि त्याच्या बाजूला एक कबुतर बसले आहे. हा फोटो शेअर करत, दीपिकाने रणवीर सिंग आणि विजय सुब्रमण्यम (कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे सीईओ) यांना टॅग केलं आहे. त्यावर तिने कॅप्शन लिहिले आहे की, “जेव्हा माझा नवरा कॉलवर कोणाशी तरी बोलतो” तिची पोस्ट नेटकऱ्यांनाही आवडल्याचं दिसून आलं आहे.

 

Deepika Padukone

Deepika Padukone

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जातात.2018 मध्ये रणवीर आणि दीपिकानं लग्न केलं होतं. लग्नाच्या 6 वर्षांनंतर 8 सप्टेंबर 2014 रोजी दोघेही एका मुलीचे पालक झाले. रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या मुलीचे नाव दुआ ठेवले.

दोघेही लवकरच नवीन चित्रपटात

प्रेग्नेसी आणि नंतर मुलीच्या जन्मामुळे दीपिकाने कामातून ब्रेक घेतला. दीपिका पदुकोण शेवटची ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती. आता ती कल्की 2898 एडी च्या सिक्वेलचे शूटिंग सुरू करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर रणवीर ‘धुरंधर’ चित्रपटात दिसणार आहे. रणवीरचा हा चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित करत आहे. आर माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि यामी गौतम हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका
हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू आहे. त्यात देशाचा विकासाचा त्यात मागमूस नाही, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुखअयमंत्री एम. के....
होळी आणि धुलीवंदनात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी कडकोट बंदोबस्त, शहराला येणार छावणीचे स्वरुप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी समोर
पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत सरकारने न्यायालयात फेरयाचिका दाखल करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
Sambhaji Nagar News – पोलीस अंमलदाराने वाचवले भाजी विक्रेत्याचे प्राण, आयुक्तांकडून कौतुक
मेहुणीवर जीव जडला, मग क्राईम शो पाहून साडूचा काटा काढला; एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत
Ratnagiri News – हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. कोकणात शिमगोत्सवाची धूम