‘सध्या मी सेलिब्रिटी…’ अभिजीत अन् निक्कीला अंकिताने लग्नाला बोलावलं का? निक्कीने स्पष्टच सांगितलं
‘कोकण हार्टेड अंकिता वालावलकरचं नुकतंच लग्न झालं आहे. अगदी दणक्यात तिचं लग्न पार पडलं. 16 फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधली. अंकिताने तिच्या मेहंदीपासून ते हळद, लग्न, रिसेप्शन ते अगदी सासरी तिचं झालेलं स्वागत,या सर्वांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
अंकिता व कुणालच्या लग्नसोहळ्याला कलाकार आणि राजकारणातील मंडळींनी खास उपस्थिती
अंकिता व कुणालच्या लग्नसोहळ्याला कलाकार आणि राजकारणातील मंडळींनी खास उपस्थिती लावली होती. पण, या लग्नसोहळ्याला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील बरेच जण अनुपस्थित होते. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे अंकिताच्या लग्नात दिसले नाहीत. त्यामुळे अंकिताने यांना निमंत्रण दिलं की नाही? हा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
निक्की अन् अभिजीतला अंकिताच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं होतं का?
याबद्दल निक्की तांबोळीला विचारण्यात आलं असता तिने याबद्दल उत्तर दिलं आहे. निक्कीने नुकतीच एका वृत्तसंस्थेच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती त्यावेळी निक्कीला तसेच अभिजीतला अंकिताने लग्नाला बोलवलं की नाही? असा प्रश्न विचारला असता निक्कीने म्हटलं की, “तिने सुरुवातीला मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण, मी माझ्या कामात इतकी व्यग्र होती की मला जमलंच नाही. परंतु, तिला माझ्या शुभेच्छा.” निक्कीच्या उत्तरावरून तरी अंकिताने तिला लग्नाचं निमंत्रण दिलं असल्याचं लक्षात येत आहे. तसेच अभिजीतच्या निमंत्रणाबद्दल मात्र निक्कीने काही भाष्य केलं नाही
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’बद्दल काय म्हणाली निक्की
‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या पर्वानंतर निक्की तांबोळी सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात ती विविध पदार्थ बनवून परीक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. मुलाखतीत निक्कीला तिच्या आवडी-निवडी विचारण्यात आल्या.
तिला सुरुवातीला विचारलं की, तिचा आवडता पदार्थ कोणता? तर त्यावर निक्कीने उत्तर देत म्हटलं “सध्या मी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’करतेय. त्यामुळे खूप सारे आवडते पदार्थ आहेत. पण, करंजी मला खूप आवडते.” त्यानंतर आवडता अभिनेता आणि अभिनेत्री विचारल्यावर निक्कीने रितेश देशमुखचं नाव घेतलं. तसंच निक्कीला ‘कल हो ना हो’ चित्रपट खूप आवडतो. याशिवाय तिचा स्वयंपाक करणं हा आवडता छंद असल्याचं देखील तिने सांगितलं.
दरम्यान अंकिता व कुणालच्या लग्नाला ‘बिग बॉस मराठी’ निक्की, अभिजीत किंवा जान्हवी दिसली नाही पण धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले यांनी मात्र खास हजेरी लावली होती. अंकिताचा ‘बिग बॉस’चा हा ग्रुप मात्र आजही तिच्या सोबत असल्याचं यावरून दिसून येतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List