कतरिना फारच धार्मिक; कर्नाटकातील या मंदिरात तब्बल 4 ते 5 तास केली ‘सर्प संस्कार पूजा’
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेताना दिसत आहे. जसं की तिने तिच्या सासूबाईंसोबत शिर्डीतील साई मंदिराला भेट दिली. यानंतर, अभिनेत्रीने प्रयागराज महाकुंभात पवित्र स्नानही केलं. आता कतरिनाने पुन्हा एकदा अशाच धार्मिक स्थळाला आवर्जून भेट दिली आहे. या मंदिरात तिने तब्बल 4 ते 5 तास पूजा केल्याचं म्हटलं जातं.
कतरिनाने कर्नाटकातील या प्रसिद्ध मंदिराला दिली भेट
कतरिना कैफ कुक्के श्री सुब्रमण्य मंदिरात पोहोचल्याचं पाहायला मिळालं आहे. येथे, भगवानांचं दर्शन घेतल्यानंतर, तिने ‘सर्प संस्कार पूजा’ या धार्मिक विधीतही तिने सहभाग नोंदवला. मंगळवारी, कतरिना कैफ कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या कुक्के श्री सुब्रमण्य मंदिरात पोहोचली. ती तिच्या मैत्रिणींसह या मंदिरात आल्याचं म्हटलं जात आहे. कतरिना बुधवार दुपारपर्यंत तिथेच राहिली. तसेच मंगळवारी मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी प्रभूचे दर्शन घेतलं आणि तिथे ‘सर्प संस्कार पूजा’ या विधीत भाग घेतला.
कतरिना 2 दिवसांपासून करत आहे ‘सर्प संस्कार पूजा
कतरिना कैफने दोन दिवसांपासून ती ‘सर्प संस्कार पूजे’ची विधी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. कतरिना तिच्या मैत्रिणींसोबत मंदिराच्या व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये राहिली. मंगळवारी त्यांनी चार ते पाच तास प्रार्थना केली. आणि बुधवारी देखील कतरिनाने ही पूजा कायम ठेवली असं सांगितलं जातं. कतरिनाचे मंदिरातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून चाहते देखील तिचं कौतुक करताना दिसत आहे. ‘संस्कारी बहू’, ‘छान संस्कार’ वैगरे असे अनेक कमेंट्स चाहते करत आहेत.
Katrina Kaif is at Kukke Subrahmanya to perform Sarpa Samskar seva
she’s here until tomorrow. pic.twitter.com/CNhKT78GpQ
— ಮನು
(@sampras004) March 11, 2025
पण ही ‘सर्प संस्कार पूजा’ म्हणजे नेमके काय?
अनेकांच्या मनात प्रश्न असेल की ‘सर्प संस्कार पूजा’ म्हणजे काय? नावावरूनच हे स्पष्ट होते की ही पूजा नागाशी म्हणजेच नाग देवतेशी संबंधित असते. ‘सर्प संस्कार पूजा’ ही हिंदू धर्माची एक विधी आहे. ही पूजा ‘कालसर्प दोष’ असलेल्या लोकांना करायला सांगतात. जर एखाद्याच्या पूर्वजांकडून जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे सापाला काही नुकसान झालं असेल, तर त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी ही पूजा प्रभावी असते असं म्हटलं जातं. कुक्के श्री सुब्रमण्य मंदिराव्यतिरिक्त, आंध्र प्रदेशातील श्री कालहस्ती मंदिरात ‘सर्प संस्कार पूजा’ देखील केली जाते.
होळीला पुन्हा प्रदर्शित होत आहे कतरिनाचा ‘नमस्ते लंडन’
कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची विजय सेतुपतीसोबत ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटात दिसली होती. आता, होळीच्या खास प्रसंगी, कतरिनाचा 2007 मध्ये आलेला ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List