Amrish Puri च्या लेकीला पाहिलंय? तिच्यापुढे अभिनेत्रींचा बोल्डनेस फेल, ‘या’ क्षेत्रात ‘मोगॅम्बो’च्या लेकीचं मोठं नाव
Amrish Puri Daughter: बॉलिवूडचे दिग्गज दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘मिस्टर इंडिया’ मध्ये मोगेंबो… ‘तहलका’ सिनेमात जनरल डोंग आणि ‘करण – अर्जुन’ सिनेमात ठाकुर दुर्जन सिंह यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला न्याय देत अमरीश पुरी यांनी झगमगत्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलं. अमरीश पूरी यांचे काही डायलॉग असे देखील आहेत, जे आजही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत.
अमरीश पुरी यांनी 450 सिनेमांपेक्षा अधिक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अमरीश पुरी यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंन केलं आहे.
अमरीश पुरी आज चाहत्यांमध्ये नसले तरी, सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या आठवणीत आहे. सलग 5 दशक अमरीश पुरी यांनी मोठ्या पडद्यावर राज्य केलं. पण अमरीश पुरी यांची मुलं मात्र झगमगत्या विश्वापासून दूर आाहेत. त्यांच्या मुलांना कोणी ओळखत देखील नाही.
सांगायचं झालं तर, अभिनेते-अभिनेत्रींची मुलं सिनेमांतून आपलं करिअर घडवताना दिसतात. मात्र अमरीश पुरी यांच्या मुलांनी तसं केलं नाही. ना त्यांचा मुलगा राजीवने अभिनयात रस दाखवला ना त्यांची लेक नम्रताने. नम्रता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, तिच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री देखील फेल आहेत.
अमरीश पुरी यांची मुलगी नम्रता पुरी लाइमलाइटपासून दूर असते. रिपोर्ट्सनुसार, तिने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि आता ती फॅशनच्या जगात सक्रिय आहे. ती फेमेला नावाचा कपड्यांचा ब्रँड चालवणारी एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.
नम्रता हिने लाइमलाइटपासून दूर असते, पण तिने स्वतःचा इन्स्टाग्राम आयडी देखील प्रायव्हेट ठेवला आहे. ती कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नम्रताच्या इन्स्टाग्रामवर 12.3 हजार फॉलोअर्स आहेत, तर तिचं प्रायव्हेट अकाउंट असून ती फक्त 410 लोकांना फॉलो करते. नम्रता सौंदर्यात कुणापेक्षा कमी नाही. नम्रता पुरी बी स्पोक इंस्टाग्राम पेजवर ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.
अमरीश पुरी यांचं निधन
अमरीश पुरी यांचे 12 जानेवारी 2005 रोजी निधन झालं. ते कर्करोगाने त्रस्त होते. अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा स्टारर ‘ऐतराज’ हा त्याचा शेवटचा सिनेमा होता. सोशल मीडियावर आजही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List