Aurangzeb Tomb : औरंगजेबाचे थडगे सरकार पाडणार? मुख्यमंत्री म्हणाले घाईने….

Aurangzeb Tomb : औरंगजेबाचे थडगे सरकार पाडणार? मुख्यमंत्री म्हणाले घाईने….

छावा चित्रपटाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. यापूर्वी इतिहासात छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याची नोंद आहे. त्यावरून कोणी गेल्या 300-350 वर्षात औरंगजेबाचे थडगे हटवण्याची मागणी उभ्या महाराष्ट्रात कोणी केली नाही. आता एका चित्रपटाने परिणाम साधला. भाजपासहित अनेक हिंदू संघटना औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आहेत. या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

अबु आझमींचे औरंगजेब प्रेम उफाळले

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी ऐनवेळी औरंगजेबावर स्तुती सुमनं उधळली. त्यामागे काय धोरण आहे, तो राजकारणाचा भाग आहे. पण त्यांच्या या कृतीने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. आझमींवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी या वक्तव्याचे अचूक टायमिंग हा चर्चेचा विषय आहे. श्री गुरु तेग बहादूर जी महाराज यांच्या 350 व्या शहीद वर्षाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेबाच्या थडग्याविषयी वक्तव्य केले.

काँग्रेसवर गंभीर आरोप

औरंगजेबाच्या थडग्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली. ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या गंभीर आरोपावर आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.

औरंगजेबाची कबर हटवणार?

औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. आता कबरीला देण्यात आलेले हे विशेष संरक्षण कायद्याचं पालन करून हटवणं अथवा बदलवणं आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत.

27 वर्षे मराठ्यांशी लढणारा औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे झाला. त्यावेळी तो 89 वर्षांचा होता. 1707 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या गुरूच्या कबरीजवळच आपली कबर बांधण्यात आली. सुफी संत शेख झैनुद्दीन दर्गा परिसरातच त्याची कबर आहे. त्यासाठी त्यावेळी 14 रुपये 12 आणे इतका खर्च करण्याची ताकद त्याने मृत्यूपत्रातच दिली होती. खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्वात मोठा फेक नरेटिव्ह म्हणजे…’, संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल ‘सर्वात मोठा फेक नरेटिव्ह म्हणजे…’, संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुलुंडमध्ये...
व्यापाऱ्यांकडून ‘गुंडा टॅक्स’ची वसुली, व्हिडिओ कॉलवर मुलांच्या हत्येची धमकी, मुंबई पोलिसांनी त्याला असे पकडले?
‘राज्य मी आणणार, त्यांना सोडणार नाही, विरोधकांची दांडी उडवणार…’, उद्धव ठाकरे यांचा कोणा कोणावर हल्ला?
‘राज ठाकरेंना ‘ती’ गोष्ट समजत नाही..’, गंगेबद्दलच्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते संतापले
भाजप हिंदुत्ववादी, देशप्रेमी आहे हेच फेक नरेटीव्ह; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे जबरदस्त फटकारे
गणपत गायकवाडांचे नाव घेऊ नको, अन्यथा तुझे बाबा सिद्दीकी करू…शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी
आम्हाला वाटलं हा डिप्रेशनमध्ये आहे; घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?