नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुंडलीच मांडली, मागितला 18 मर्सिडीजचा हिशोब

नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुंडलीच मांडली, मागितला 18 मर्सिडीजचा हिशोब

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे, नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं असून, पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.  शिवसेना ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हे यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेमंक काय म्हणाले अखिल चित्रे? 

‘आजपर्यंत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ९ पदांसाठी १८ मर्सिडीज दिल्या… म्हणजे

ह्या गाड्या देऊन पदं मिळवत होत्या असं मानावं का? म्हणजे ही पदं त्यांनी स्व-कर्तृत्वावर मिळवली नव्हती ! कृपया महाराष्ट्राने दखल घ्यावी. कारण

२००२ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड (पहिला कार्यकाल)
२००८ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (दुसरा कार्यकाल)
२०१० : शिवसेना पक्षाचे प्रवक्ते
२०११ पासून: शिवसेना उपनेते
२०१४ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (तिसरा कार्यकाल)
२०१५: विशेष हक्क समिती (विशेष हक्क समिती) अध्यक्ष, महाराष्ट्र विधान मंडळ
२०१९: महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापती म्हणून निवड
२०२०: महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (चौथा कार्यकाल)
२०२०: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून पुनर्निवड ते आजतागायत

नीलम ताई तुम्ही म्हणता १ पदासाठी शिवसेनेत २ मर्सिडीज द्यावी लागतात मग वरील ९ पदांसाठी तुम्ही दिलेल्या १८ मर्सिडीजची माहिती महाराष्ट्रासमोर मांडू शकलात तर बरं होईल. २२ फेब्रुवारी १९९८ रोजी म्हणजे बरोबर २७ वर्षांपूर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजींच्या कार्यकाळात इतकं मिळूनही अन्याय म्हणत असाल तर तुम्हाला साहित्याची पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो ‘हा शुद्ध कृतघ्नपणा आहे’ ! असं ट्विट चित्रे यांनी केलं आहे.

 

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे, त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. अखिल चित्रे यांच्यानंतर आता विनायक राऊत यांनी देखील गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात असते....
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती
झोपण्यापूर्वी हे पाणी प्या… चमत्कारीक फायदे ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल; वस्तू छोटी पण…
IND Vs PAK – टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 6 गडी राखून दणदणीत विजय
राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल; विद्यार्थ्यांवर अन्याय?