मिंधे गटाने दुकान हडपलं, जीवे मारण्याची धमकी दिली आणि थाटलं पक्ष कार्यालय
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या मिंधे गटाने मराठी माणसावरच अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे मराठी मराठी करायच आणि दुसरीकडे त्याच मराठी माणसाच्या साधेपणाचा गैरफायदा घेण्याच धाडस मिंधे गटाने केलं आहे. असाच प्रकार जानेवारी महिन्यात मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील इराणीवडी येथे राहणाऱ्या पै कुटुंबासोबत घडला आहे. मिंधे गटाच्या विभागप्रमुखाने पै कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढत दुकान हडपलं आणि त्या जागेवर पक्ष कार्यालय सुरू केलं.
आर्थिक अडचणीत असलेल्या पै कुटुंबांला आधार देण्याचा बनाव करत सप्टेंबर 2019 मध्ये हरिश माकडीया, लालसिंग राज पुरोहित आणि अश्विन गोहिले यांनी पै कुटुंबाकडे दुकान विकत घेण्याची मागणी केली. यावेळी दत्ताराम यांनी दुकानाची किंमत 70 लाख रुपये सांगितली, तसेच दुकानाची स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरायची बाकी असल्याचे त्यांना सांगितले होते. यावेळी स्टॅम्प ड्युटी सुद्धा आम्हीच भरू असे, मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आणि 57 लाख रुपये दुकानाची किंमत फायनल करण्यात आली. यावेळी काही रक्कम देऊन व्यवहार पक्का करण्यात आला. तसेच दोन ते तीन दिवसात कागदपत्रे तयार करुन देतो असे सांगण्यात आले.
त्यानंतर तक्रारदार पै कुटुंबाने हक्काच्या पैशांची मागणी केली असता लालसिंग राज पुरोहित याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पै कुटुंबीयांना केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पूर्ण व्यवहार होण्याच्या अगोदरच दुकानाच्या जागेवर मिंधे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राज पुरोहित याने आपले संपर्क कार्यालय उभारले आहे. त्यामुळे हवालदील झालेल्या पै कुटुंबाने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र गुन्हा दाखल झाला नाही. अखेर आज लालसिंग राज पुरोहित आणि हरीश माकडिया यांच्या विरोधात कांदिवली पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List