Mumbai IT Raid – पार्ले-जी बिस्किट उत्पादन युनिटवर आयकर विभागाचा छापा
मुंबईतील विलेपार्ले परिसरात स्थित प्रसिद्ध बिस्किट कंपनी पार्ले-जी च्या उत्पादन युनिटवर आयकर विभागाने शुक्रवारी छापा टाकला. फॉरेन अॅसेट युनिट आणि आयकर विभागाच्या चौकशी पथकाकडून हा छापा टाकण्यात आला. कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. हा छापा नेमका कोणत्या कारणातून टाकला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पार्ले-जी बिस्किट उत्पादन कंपनीची स्थापना 1929 मध्ये झाली. त्यानंतर 1938 मध्ये कंपनीने पार्ले-ग्लुको या नावाने बिस्किटे बनवण्यास सुरुवात केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, पार्ले बिस्किटचा नफा आर्थिक वर्ष 23 मध्ये 743.66 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 24 मध्ये दुप्पट होऊन 1,606.95 कोटी रुपयांवर पोहोचला. 2018-19 मध्ये त्यांचे ऑपरेटिंग उत्पन्न 2टक्के वाढून 14,349.4 कोटी रुपये झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List