लष्करी नाही, चार्टड विमान; मोकळे हात… अमेरिकेकडून अवैध स्थलांतरित नेपाळी नागरिकांचा ठेवण्यात आला सन्मान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय चांगलाच चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या लष्करी विमानांतून आणि कैद्यांप्रमाणे हात बांधून अवैध स्थलांतरित नागरिकांना पाठवण्यात येत होते. हिंदुस्थानी नागरिकांना तसेच पाठवण्यात आले होते. मात्र नेपाळमधील नागरिकांना यावेळी पहिल्यांदा लष्करी नाही तर चार्टड विमानाने आणि कैद्याप्रमाणे हात बांधून पाठवण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.
5 मार्च, बुधवारी 8 नेपाळी नागरिकांच्या तुकडीला चार्टर्ड विमानाने काठमांडूला परत पाठवण्यात आले आहे. ग्रायफॉन एअरचे गल्फस्ट्रीम विमान बुधवारी सकाळी १० वाजता (एनएसटी) अल्बेनियाहून साउथ हॅम्पशायरहून त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. आठ जणांपैकी काही जण अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत होते, तर काहींना इमिग्रेशन उल्लंघनासाठी हद्दपार करण्यात आले.
हद्दपार केलेले नागरिक त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंग बेमध्ये चार्टर्ड विमानातून उतरताना हँड-बॅग्ज घेऊन जाताना दिसले. त्यांच्या आगमनानंतर, नेपाळ पोलिसांच्या मानवी तस्करी तपास पथकाने हद्दपार केलेल्या व्यक्तींची चौकशी केली. यासंदर्भात ब्युरोचे प्रवक्ते, पोलीस अधीक्षक नरेंद्र कुंवर यांनी पत्रकारांना माहिती दिली की, या नागरिकांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या अमेरिकेतली वास्तव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. ‘प्रारंभिक चौकशीदरम्यान, असे उघड झाले आहे की त्यापैकी काही जण जमिनीमार्गे ब्राझीलमधून अमेरिकेत गेले होते. अमेरिकन इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना हद्दपार करण्यात आले’. एएनआयने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दरम्यान, याआधी 27 नेपाळी नागरिकांना परत पाठवण्यात आले होते. त्यावेळी मात्र लष्कराच्या विमानाचा वापर करण्यात आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List