Solapur News – भैय्याजी जोशी, राहुल सोलापूरकर व कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा, शिवसेना आक्रमक

मराठी भाषेचा अवमान केलेल्या भैय्याजी जोशी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेल्या राहुल सोलापुरकर व कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भैय्या जोशींनी मराठी भाषेचा अवमान केल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी (07 मार्च 2025) दुपारी 12 वाजता चार हुतात्मा चौकात निषेध करण्यात आला. तसेच मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान प्रकरणी भैय्या जोशी, राहुल सोलापूरकर व कोरटकर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला सरकारने दाखल करावा, भैय्या जोशी, राहुल सोलापूरकर आणि कोरटकर यांचा धिक्कार असो, मराठी आमची माय, मराठी आमच्या रक्तात, मराठी आमच्या हृदयात… अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून सोडला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.अजय दासरी यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या निषेध आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर शहरप्रमुख भैय्या धाराशिवकर, दत्तपंत वानकर, शरणराज केंगनालकर तसेच पदाधिकारी शशी बिराजदार, दत्ता माने, बाळासाहेब गायकवाड, अनिल जाधव, अजय खांडेकर, नाना मोरे, दत्ता खलाटे, डॉ शकील अत्तार, जरगीस मुल्ला, प्रकाश पवार, धनराज जानकर, चंद्रकांत मानवी, शिवा ढोकले, राजेश वडीशेरला, रवी नागणकेरी, संगाप्पा कोरे, संतोष गंधुरे, संताजी भोळे, अनिल जाधव, राम वाकसे, मच्छिंद्र आयगोळे, बंटी बेलमकर, गणेश कर्वे, सागर कोळी, चीरू जाधव, रविकांत घंटे, मडीवालप्पा दहिटने, सखाराम वाघ, विश्वेश्वर गड्डम, सुरेश शिंदे, लहू गायकवाड, रेवन पुराणिक व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List