रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार; सरकार उचलणार दीड लाखापर्यंतचा खर्च

रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार; सरकार उचलणार दीड लाखापर्यंतचा खर्च

देशात रस्ते अपघातांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे, परंतु रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना आता मोफत उपचार दिले जाणार आहेत. या महिन्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार असून मोफत उपचारांतर्गत जखमींवर दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलणार आहे.

सरकारी हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांनाही हा नियम बंधनकारक करण्यात आला असून संपूर्ण देशभरात या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नोडल एजन्सी काम पाहणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातील पीडितांना पॅशलेस उपचार मिळावा यासाठी मागील वर्षी 14 मार्च 2024 रोजी पॅशलेस उपचार योजना हा पायलट प्रकल्प सुरू केला होता. त्यानंतर 7 जानेवारी 2025 रोजी नितीन गडकरी यांनी देशभरात या योजनेची अधिकृत सुरुवात करण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशात कुठेही रस्ते अपघात झाल्यास जखमी व्यक्तीला उपचारासाठी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त दीड लाखापर्यंची मदत दिली जाणार आहे. जर उपचारासाठी जास्त पैसे लागणार असतील तर ते रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला द्यावे लागतील.

उपचाराअभावी मृत्यूचे प्रमाण वाढले

देशात रस्ते अपघातात जखमी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे जखमी व्यक्तींचा मृत्यू होतो, असे वारंवार निदर्शनास आले आहे. ही संख्या जवळपास 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आहे, असेही समोर आले आहे. 2023 मध्ये रस्ते अपघातात जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2024 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान 1.2 लाख लोकांचा मृत्यू झाला.

सहा राज्यांत पायलट प्रोजेक्ट यशस्वी

रस्ते अपघातात जखमी व्यक्तींना तत्काळ उपचार मिळावा यासाठी मागील पाच महिन्यांत पुद्दुचेरी, आसाम, हरयाणा आणि पंजाबसह सहा राज्यांमध्ये एक पायलट प्रोजेक्ट चालवण्यात आला होता. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला असल्याने आता संपूर्ण देशात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अपघातस्थळी जखमी व्यक्तीला त्वरित उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयात कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. खासगी आणि सरकारी अशा दोन्ही हॉस्पिटलांमध्ये जखमी व्यक्तीला पॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले… MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले…
MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य सरकारच्या विविध पदांची भरती केली जाते. सरकारी अधिकारी होण्यासाठी राज्यभरातील युवक प्रयत्न करत...
मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट, वडिलांची हायकोर्टात धाव
रिल बनवणाऱ्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितले…
जयंत पाटलांचा ‘तो’ प्रश्न, फडणवीसांचं उत्तर; नितेश राणेंना नेमका काय दिला सल्ला?
झोप येण्यात येतोय अडथळा, या 5 प्रकाराच्या फूड्सची मिळेल मदत, पाहा कोणते?
रव्यापासून बनवता येणारे 8 चविष्ट स्नॅक्स, झटपट अन् हेल्दीसुद्धा असणार
Pune News – महिला पोलीस भरती दरम्यान चेंगराचेंगरी, अनेक उमेदवार जखमी