उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधिमंडळाकडून चांगली बातमी, त्या पत्रानंतर मिळणार महत्वाचे पद

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधिमंडळाकडून चांगली बातमी, त्या पत्रानंतर मिळणार महत्वाचे पद

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. महायुतीचे 232 आमदार निवडून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला विधिमंडळाच्या एकूण सदस्यांपैकी दहा टक्के आमदार निवडून आणता आले नाही. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नसणार, अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधिमंडळाला पत्र लिहिले होते. त्याचे सकारात्मक उत्तर ठाकरे गटाला मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणत्या नियमाची होती अडचण

लोकसभेत 2014च्या निवडणुकीत आणि 2019च्या निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद नव्हते. कारण या दोन्ही निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे तोच नियम महाराष्ट्र विधानसभेत लागू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. राज्यातील विधानसभेत 288 जागा आहेत. त्यानुसार दहा टक्के म्हणजे 28 आमदार किंवा त्यापेक्षा जास्त संख्या असलेल्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार होते. परंतु ठाकरे यांच्या शिवसेनेला 20 काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यात पुढील पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद असणार नाही, अशी चर्चा सुरु होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत संकेत दिले होते.

पत्राला मिळाले उत्तर

विधानसभेत दहा टक्के जागा असल्याशिवाय विरोधी पक्षनेतेपद दिले जात नाही? यासंदर्भात काही नियम आहे का? त्याची माहिती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 25 नोव्हेंबर 2024 रोजी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला उत्तर विधिमंडळाकडून मिळाले आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात अशी कोणती तरतूद नाही. त्यामुळे दहा टक्के संख्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. आता विधानसभेत ठाकरे यांच्या शिवसेनेतून कोणाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार? त्याची चर्चा सुरु झाली आहे.

अंबादास दानवे यांचे पद जाणार

विधानसभेत ठाकरे यांच्या शिवसेनेचे जास्त सदस्य आहेत. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंकडे जाणार आहे. परंतु विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसने आपला दावा केला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा दावा केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : अगोदर हिंदूवर हल्ले करायचे नंतर दंगली भडकावायच्या, संजय राऊतांनी सांगितला नवीन पॅटर्न, काय केला आरोप? Sanjay Raut : अगोदर हिंदूवर हल्ले करायचे नंतर दंगली भडकावायच्या, संजय राऊतांनी सांगितला नवीन पॅटर्न, काय केला आरोप?
औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर नागपूरमध्ये संध्याकाळी मोठा हिंसाचार उसळला. महाल भागातील या वणव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या हिंसाचारावर...
आमिरच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा होताच किरण रावने केली पहिली पोस्ट, म्हणाली ‘तू आमच्या आयुष्यातील VVIP पण…’
रेखासोबत रोमान्स करणार होता ‘हा’ पाकिस्तानी अभिनेता, पण…
‘यापुढे स्त्री पात्र करणार नाही’; सागर कारंडेच्या निर्णयाने चाहत्यांना बसला धक्का!
Ex ला केलेली मारहाण, वयाच्या 51 व्या अविवाहित गीता म्हणाली, ‘शारीरिकदृष्ट्या समाधानी…’
‘तू तर दलित आहेस’ म्हणणाऱ्याला जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने चांगलंच सुनावलं, म्हणाला ‘खरंच अस्पृश्य..’
प्रशांत दामलेंचा मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय