Govinda – Sunita Ahuja : कोई माई का लाल…घटस्फोटाच्या चर्चानंतर सुनीता अहुजाची पहिली प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी सर्वांनाच हैराण केले होते. सुनीता आणि गोविंदा त्यांचे 37 वर्ष जुने वैवाहिक जीवन संपवत आहेत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र या बातमीमुळे बरीच खळबळ उडाली. गोविंदाच्या चाहत्यांसाठी तर हा मोठा धक्का होता. मात्र या सर्व चर्चांच्या दरम्यान आता गोविंदाची पत्नी, सुनिता अहुजा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून तिने याविषयावरचं मौन सोडलं आहे. या अफवांच्या दरम्यान, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने घटस्फोट आणि विभक्त होण्यामागचे कारण उघड केले आहे. हा व्हिडीो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.
वेगळं राहण्याचं कारण काय ?
सुनीता आहुजाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की ती आणि गोविंदा वेगळ्या घरात राहत आहेत. गेल्या 12 वर्षांपासून आपण वाढदिवस एकट्याने साजरा करत असल्याचेही तिने नमूद केलं होतं. मात्र त्यामुळे सुनिता आणि गोविंदा यांच्यात मतभेद असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळेच त्यांच्या अफवांच्या चर्चांनीही जोर धरला. गेल्या काही दिवसांपासून तर या अपवा बऱ्याच वाढल्या होत्या. याचदरम्यान सुनिता अहुजा या नुकत्याच मुबईतील एका मंदिरात स्पॉट झाल्या. त्यावेळी त्यांना तिथे पाहून पापाराझी त्यांच्या मागे धावले आणि गोविंदा सोबतच्या घटस्फोटाच्या तसेच वेगळं होण्याच्या चर्चांमागील कारण त्यांना विचारलं.
म्हणून आम्ही वेगळे राहतो…
तुम्ही गोविंदापासून दूर राहता का, या प्रश्नावर सुनिता यांन थेट उत्तर दिलं. ‘ गोविंदा हे जेव्हा राजकारणात आले, तेव्हा अनेक नेते घरी यायचे. त्यावेळी टीना, आमची मुलगी वयात येत होती. ती असो किंवा मी, आम्ही घरात शॉर्ट्स वगैरे घालून फिरायचो. पण बाहेरच्या लोकांसमोर असं फिरणं मला आवडत नव्हत. त्यामुळेच आम्ही वेगळा फ्लॅट घेतला, जिथे ते ( गोविंदा) मीटिंग घेऊ शकतील, असा खुलासा त्यांनी केला. मला आणि गोविंदाला कोणीच वेगळं करू शकत नाही. असं कोणी असेल तर समोर यावं’ असं थेट आव्हानच सुनिता यांनी दिलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे फक्त पॅप्सचा नव्हे तर गोविंदाच्या चाहत्यांचा जीवही भांड्यात पडला आहे. ते निश्चिंत झाले.
लोकांनी टाकला सुटकेचा निश्वास
सुनीता आहुजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनिता यांचं वक्तव्य ऐकून लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या व्हिडीओवर लोकांच्या अनेक कमेंट्सीही येत आहेत. ‘ याच व्हिडीओची आम्ही कधीपासून वाट बघत होतो. लोकं उगाचच घटस्फोटाच्या अफवा का पसरवत होते ‘ असा सवाल एका युजरने केला. ‘मग गोविंदाच्या पायात गोळी कोणी मारली ?’असा सवाल विचारत एका चाहत्याने गंमत केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List